
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टी20 विश्वचषक सुरू व्हायला फक्त 7 दिवस आहेत. पाकिस्तानचे सर्व सामना श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत. तर भारत आणि विश्वचषकामध्ये सहभागी होणाऱ्या संघाचे सामने हे भारतामध्ये खेळवले जाणार आहेत. टी20 विश्वचषकाआधी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात दमदार केली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात सलमान आगाच्या संघाने २० धावांनी विजय मिळवला.
पाकिस्तानच्या विजयाबद्दल पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतः सोशल मीडियावर संघाचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांचे कौतुक केले. तथापि, पंतप्रधानांना त्यांच्या पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात टीका झाली, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रासह सोशल मीडियावरील चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका झाली.
पहिल्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या विजयानंतर शाहबाज शरीफ यांनी एक्स वर लिहिले, “पहिल्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीम पाकिस्तानचे अभिनंदन. पाकिस्तान क्रिकेटला बळकटी देण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल मी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करतो. हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आरसा दाखवताना आकाश चोप्रा म्हणाले की, द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या बी टीमला २० धावांनी हरवणे ही मोठी गोष्ट नाही. आकाश चोप्रा यांनी लिहिले, “सर्व आदराने… हा ऑस्ट्रेलियाच्या बी टीमविरुद्धचा द्विपक्षीय टी२० सामना आहे. अनेक प्रमुख खेळाडूंनी भाग घेतला नाही. आणि १७० धावांच्या सामन्यात २० धावांनी मिळालेला विजय ‘जबरदस्त’ म्हणता येणार नाही.”
With due respect…it’s a bilateral T20i against Australia’s B team. Many main players have given it a miss. And a 20-run win in a 170 run game can’t possibly qualify as ‘electrifying’ 🫣 https://t.co/allr7esAbr — Aakash Chopra (@cricketaakash) January 30, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १६८ धावा केल्या. या काळात एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. सॅम अयुबने ४० धावा काढत संघाचा सर्वाधिक धावा काढल्या, तर कर्णधार सलमान आघा ३९ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ८ गडी गमावून फक्त १४६ धावा करता आल्या. सॅम अयुबने गोलंदाजीतही २ विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.