फोटो सौजन्य - BCCI/Star Sports सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला, यामध्ये भारताच्या संघाने गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी करून सामन्यात विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली.
दुसरीकडे, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर आहे, सध्या बुमराह या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. त्याचवेळी, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने हर्षित राणाच्या एकदिवसीय पदार्पणामुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. अजुनपर्यत बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही अधिरकृत माहिती दिलेली नाही परंतु यावर आता मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
SL vs AUS : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात हाईवोल्टेज ड्रामा, सोशल मीडियावर Video Viral
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. ज्यामुळे बुमराहला मालिकेतील शेवटच्या कसोटीत मैदान सोडावे लागले. खरंतर, बुमराहला सध्या पाठीच्या दुखण्याचा त्रास आहे. ज्यामुळे त्याला इंग्लंडसोबत खेळलेल्या टी-२० मालिकेला मुकावे लागले. त्याच वेळी, आता त्याला एकदिवसीय मालिकेतही खेळणे कठीण मानले जात आहे.
आता, बुमराहबद्दल, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला, “हर्षित राणाच्या पदार्पणामुळे, मला वाटते की जसप्रीत बुमराहची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्ही असा विचार करत असाल की जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नसेल आणि तुम्हाला हर्षितला घ्यावे लागेल, कारण तो सध्या सिराजपेक्षा पुढे आहे, तर त्याला पदार्पणाशिवाय घेतल्याने तुमचे हृदय जलद होईल. हर्षितच्या पदार्पणामुळे मला असे वाटते की बुमराह संघात नसण्याची शक्यता आहे.”
Which mistake from #CWC2019 should #TeamIndia avoid in #CT2025. Hear it from experts @ImRaina & @cricketaakash!💡
📺 Start watching FREE on Disney+ Hotstar!#INDvENGOnJioStar 2nd ODI 👉 SUN, 9th FEB, 12:30 PM on Disney+ Hotstar, Star Sports 2, Star Sports 3, Sports 18 1 &… pic.twitter.com/eBVnc1mw1t
— Star Sports (@StarSportsIndia) February 6, 2025
पहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पदार्पण केले. जयस्वालसाठी पदार्पणाचा सामना काही खास नव्हता, पण हर्षित राणाने निश्चितच खळबळ उडवून दिली. तथापि, या सामन्यात हर्षित गोलंदाजी करताना महागडा ठरला. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात, हर्षितने ७ षटकांत ५७ धावा देत ३ बळी घेतले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामान्यांमधून विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर होता त्यामुळे श्रेयस अय्यरला संघामध्ये स्थान मिळाले होते. विराट कोहली त्याचबरोबर जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झालेचे दिसत आहे. आता विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही हे पाहणं महत्वाचे ठरेल. कालच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामान्यांमधून रिषभ पंतला सुद्धा प्लेइंग ११ मधून वगळण्यात आले होते.