
Jos Buttler Completed 15000 Runs in T20I
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात जोस बटलरने चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १६ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. या खेळीमुळे बटलरने केवळ टी२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण केल्या नाहीत, तर तो पुन्हा एकदा या फॉरमॅटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्डला मागे टाकले. पोलार्डने ७५४ टी२० सामन्यांच्या ६७१ डावांमध्ये एकूण १४,९९९ धावा केल्या आहेत.
दरम्यान, ३६ वर्षीय बटलरने आपल्या ५२८ व्या सामन्यातील ४९७ व्या डावात १५,००० धावांचा टप्पा गाठला. बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये ९ शतके आणि १०७ अर्धशतके झळकावली आहेत. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १५,००० धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली १४,२१८ धावांसह सहाव्या स्थानावर आहे.
🚨 JOS BUTTLER CREATED HISTORY – FIRST BATTER EVER TO COMPLETE 15,000 RUNS IN T20s 🫡🔥 Jos Buttler – 15,000 runs.
Kieron Pollard – 14,999 runs. Buttler – One of the Greatest ever. pic.twitter.com/FOeP1VHVSk — Johns. (@CricCrazyJohns) September 18, 2026