IND vs AUS: Oakley fire against India! Gill gave two shocks to the army, 'this' player wants to play in the Ashes series
Josh Hazlewood to play in Ashes Trophy : ऑस्ट्रेलिया आणि भारत(IND vs AUS )यांच्यात रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने शानदार कामगिरी केली. अशातच आता जोश हेझलवूडने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेसमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ही मलिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हेझलवूडने आता जाहीर केले आहे की तो अॅशेस मालिकेतील सर्व पाचही कसोटी सामने खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
हेही वाचा : PAK-AFG WAR : ICC च्या ‘त्या’ विधानाने पाकला झोंबली मिरची! अफगाणी क्रिकेटपटू मृत्यू प्रकरण; वाचा सविस्तर
जोश हेझलवूडने रविवारी पर्थमध्ये भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याला आशा आहे की, पर्थमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला आणि त्याच्या संघाला मिळालेल्या खेळपट्टीसारखीच खेळपट्टी अॅशेस मालिकेत मिळेल. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे पॅट कमिन्सचा अॅशेसमधील सहभाग अजून देखील अनिश्चित आहे. दरम्यान, जोश हेझलवूड म्हणाला की वेगवान गोलंदाजांच्या कारकिर्दीत दुखापती होणे हे सामान्य आहे.
हेझलवूडला अॅशेस मालिकेतील सर्व पाचही सामने खेळण्याचा विश्वास आहे. तो म्हणाला की, “एका वेगवान गोलंदाजाचे आयुष्य असेच असते. प्रत्येक खेळाडूला काही ना काही समस्या निर्माण होत असतात. सध्या, मी पूर्णपणे तंदुरुस्त असून मला खात्री आहे की मी पाचही कसोटी कोणत्याही अडचणीशिवाय खेळेल.”
२०२१ मध्ये पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यापासून, हेझलवुडने प्रत्येक उन्हाळ्यात घरच्या मैदानावर अनेक कसोटी सामने गमावलेले आहेत. तथापि, २०२३-२४ मध्ये, त्याला वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांमध्ये खेळवण्यात आले होते. सध्या, जोश हेझलवुड भारताविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा भाग आहे.
हेही वाचा : Women World Cup 2025 : “मला आशा होती, भारत…”, इंग्लंडविरुद्ध पराभव जिव्हारी; स्मृती मानधनाने व्यक्त केली खंत
जोश हेझलवुडने १९ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध पावसामुळे व्यत्यय आलेल्या एकदिवसीय सामन्यात सात षटके गोलंदाजी केली, यादरम्यान त्याने २० धावांच्या मोबदल्यात २ बळी टिपले. त्याने दोन मेडन षटके देखील टाकले. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस पद्धतीने ७ विकेटने सामना आपल्या खिशात टाकला.
जोश हेझलवुड या वेगवान गोलंदाजाने ७६ कसोटी सामन्यांमध्ये १४३ डावांमध्ये २४.२२ च्या सरासरीने २९५ बळी टिपले आहेत. या काळात, हेझलवूडने १३ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया साधली आहे.