फोटो सौजन्य : X
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने कमालीची खेळी दाखवत गुजरातच्या संघाला न्यू चंदिगड मैदानावर पराभूत करून क्वालिफायर दोन मध्ये स्थान पक्के केले आहे. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची फलंदाजी चांगली राहिली. गुजरात टायटन्सचा खराब गोलंदाजीमुळे संघाला मोठी धावसंख्येचा पाठला करताना अडचणी आल्या. कालच्या सामन्या आधी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्यामध्ये थोडावेळ बाचाबाची त्याचबरोबर नाराजी पाहायला मिळाली.
हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल या दोघांमध्ये का नाराज आहे ती या संदर्भात तर स्पष्ट झाले नाही पण सध्या गुजरात टायटन्सच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईने या सामन्यात २० धावांनी विजय मिळवला आणि गुजरातचे स्वप्न धूळीला चारले. पराभवानंतर, जीटीचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराच्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.
शिवम दुबे भारतीय संघासाठी ठरला ‘लकी’ चार्म! आकडे पाहुन तुम्हालाही बसेल धक्का, असे करणार जगातला पहिला खेळाडू
आयपीएल २०२५ मध्ये, गुजरातला दुसऱ्यांदा जेतेपदाची आशा होती. पण मुंबईने गुजरातची स्वप्ने भंग केली. शेवटच्या षटकापर्यंत खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ढसाढसा रडत आहे. त्याच्या वडिलांचे स्वप्न भंगलेले पाहून तो सहन करू शकला नाही आणि स्टँडमध्ये रडू लागला. या वेळी, आशिषच्या मोठ्या मुलाने त्याला शांत केले.
Nehra ka Beta bada hoke humse badla lega 🤣🤣#MIvsGT pic.twitter.com/2j8Z17Hxx1
— WTF Cricket (@CricketWtf) May 30, 2025
जीटीने आयपीएल २०२२ मध्ये पहिले विजेतेपद जिंकले. त्यावेळी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या होता. पण हार्दिक आयपीएल २०२४ मध्ये मुंबईचा कर्णधार बनला. अशा परिस्थितीत त्याने आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात त्याच्या जुन्या संघाला हरवले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत २२८ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माने ५० चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूत ४७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने २० षटकांत ६ गडी गमावून २०८ धावा केल्या. जीटीकडून साई सुदर्शनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी केली.