फोटो सौजन्य : Proteas Men
कागिसो रबाडा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कालपासुन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकले होते आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फायदेशी र ठरला त्याचे कारण म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची कमालीची कामगिरी. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनल सामन्याच्या पहिल्या इंनिगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने धुव्वादार कामगिरी केली.
११ जून रोजी लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने ५ विकेट्स नावावर घेतले, त्यानंतर सोशल मिडीयावर त्याची मोठ्या प्रमाणात व्हा व्हा झाली. यादरम्यान कागिसो रबाडाने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विश्वविक्रम मोडला. रबाडा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्ट्राइक रेट असलेला गोलंदाज बनला आहे , ज्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये २०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
KAGISO RABADA PICKS UP A FIVE WICKET HAUL IN WTC FINAL. 🏆
– An iconic spell by Rabada Vs Australia. pic.twitter.com/SGjGU5tsrR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 11, 2025
आतापर्यंत जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये किमान 200 विकेट्स घेऊन सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेला गोलंदाज होता, परंतु रबाडाने बुमराहकडून हा विश्वविक्रम हिसकावून घेतला आहे. तथापि, जेव्हा बुमराहला कसोटीत गोलंदाजी करण्याची संधी मिळते तेव्हा तो पुन्हा हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जर कोणत्याही गोलंदाजाचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट असेल तर तो कागिसो रबाडा आहे. त्याचा स्ट्राईक रेट ३९.१ आहे, तर जसप्रीत बुमराहचा स्ट्राईक रेट ४२ आहे. डेल स्टेन ४२.३ सह तिसऱ्या, वकार युनूस ४३.४ सह चौथ्या, पॅट कमिन्स ४६.३ सह पाचव्या आणि माल्कम मार्शल ४६.७ सह सहाव्या स्थानावर आहेत.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 212 धावांवर गुंडाळलं. यामध्ये गोलंदाजांनी कमालिचा खेळ दाखवला होता. त्यानंतर सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत आहे, यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या दिनाच्या समाप्तीवर ४ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये 22 ओव्हरमध्ये 43 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिनाच्या सुरुवातीला टेम्बा बवुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम हे फलंदाजी करत आहेत.