फोटो सौजन्य : X
Major League Cricket 2025 : आयपीएल 2025 चा हा 18 वा सिझन संपला आहे, आता भारतीय क्रिकेटसाठी इंग्लडची मेजवानी असणार आहे. त्याचबरोबर 11 जूनपासुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरु झाली आहे. त्यानंतर अमेरिकेत क्रिकेट फारसे लोकप्रिय नसले तरी, मेजर लीग क्रिकेट म्हणजेच MLC चा विचार केला तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या T20 लीगवर खिळलेल्या असतात. कारण म्हणजे या लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटपटूंचा सहभाग. या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज खेळाडू देखील सहभागी होतात.
SA vs AUS : WTC फायनलमध्ये कोण मारणार बाजी? वाचा पहिल्या दिवसाचा सविस्तर अहवाल
2023 पासून एकामागून एक क्रिकेटपटू आपली क्रेझ पसरवत आहेत. या वर्षी 13 जूनपासून तिसरा हंगाम सुरू होणार आहे, ज्यामध्ये 6 संघ जेतेपद जिंकण्यासाठी संघर्ष करतील. स्टीव्ह स्मिथ, कोरी अँडरसन, किरॉन पोलार्ड आणि सुनील नारायण सारखी मोठी नावे या लीगमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत. MLC 2025 चे सामने कधी आणि कुठे खेळले जातील आणि तुम्ही भारतात या लीगचे सामने कसे पाहू शकाल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या स्पर्धेचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण होणार नाही अशी माहिती समोर आले आहे तुम्ही या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता ही लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐈𝐒 𝐇𝐄𝐑𝐄! 🏆
Who will rise as the champion of #T20Mumbai? 👀#MCA #BCCI #Cricket #Wankhede pic.twitter.com/0tYUO5mHMA
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) June 11, 2025
या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत सुनील नारायण हा लॉस एंजल नाईट रायडर्सचा कर्णधार असणार आहे तर निकलोच पुरण कडे एम आय न्यूयॉर्कचे कर्णधार पद सुटवण्यात आले आहे. सन फ्रान्सिको युनिफॉर्मचे कर्णधारपद हे कोरि अँडरसन याच्याकडे देण्यात आले आहे. सिॲटल ऑर्कस या संघाचे कर्णधारपद हेनरिक क्लासेनकडे सोपवण्यात आले आहे. टेक्सास सुपर किंग्स या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल हा वॉशिंग्टन फ्रीडॉन या संघाची कमान सांभाळणार आहे.
आयपीएल २०२५ मधील खराब कामगिरीनंतर, रशीद खानने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. रशीदच्या या निर्णयाने आता चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. रशीदच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. गेल्या हंगामात रशीदने १० विकेट्स घेतल्या होत्या, तर त्याची इकॉनॉमी ७ च्या खाली होती. आता रशीद खानने मेजर लीग क्रिकेट २०२५ पासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच रशीद या हंगामात खेळताना दिसणार नाही.