
Kho-Kho Tournament : खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या खो-खोपटूंची कसोटी; 6 नोव्हेंबरला निवड चाचणी
Kho-Kho Tournament : आगामी आठव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यातील युवा खो-खोपटूंना संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांची राज्यस्तरीय निवड चाचणी 6 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
आगामी 11 ते 22 डिसेंबर 2026 या कालावधीत तेलंगणा येथे आठव्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खो-खो संघांची निवड करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहकार्याने ही चाचणी घेण्यात येणार आहे.
निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खेळाडूंचे मैदानावरील कौशल्य आणि कामगिरी पाहून महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघासाठी गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधारकार्ड किंवा पासपोर्ट, इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र, जन्मतारखेच्या पाच वर्षांच्या आत वितरित केलेला मूळ जन्मदाखला आणि शाळेचे बोनाफाइड प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. याशिवाय सराव आणि निवड चाचणीसाठी आवश्यक स्पोर्ट्स शूजही आणावेत.
फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती
निवड चाचणीच्या दिवशी खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे आणि क्रीडा साहित्य सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी संतोष बाबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.
Ans: पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात निवड चाचणी होणार आहे.
Ans: आधारकार्ड किंवा पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, जन्मतारखेच्या पाच वर्षांच्या आत वितरित केलेला मूळ जन्मदाखला आणि शाळेचे बोनाफाइड प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Ans: ही स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर 2026 या कालावधीत तेलंगणा येथे होणार आहे.