क्रिस्टियानो रोनाल्डोच निवृत्ती (फोटो- ians)
Portugal estará sempre em mim https://t.co/dnFj51rxmh — Cristiano Ronaldo (@Cristiano) November 5, 2026
क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाकडून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००३ मध्ये केली होती. त्यानंतरच्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने आपल्या जिद्दीच्या, कौशल्याच्या आणि नेतृत्वाच्या बळावर फुटबॉल विश्वात आपले साम्राज्य निर्माण केले. पोर्तुगालसाठी खेळताना रोनाल्डोने आपल्या २३२ सामन्यांच्या शानदार कारकिर्दीत 146 गोल्स केले आहेत.
पोर्तुगालच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक गोल करण्याचा अनोखा विक्रम रोनाल्डोच्याच नावावर आहे. केवळ एक उत्कृष्ट खेळाडूच नव्हे, तर एक यशस्वी कर्णधार म्हणूनही त्याने पोर्तुगाल संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वाचे विजय प्राप्त केले आहेत.
रोनाल्डोच्या कर्णधारपदाखाली पोर्तुगालने २०१६ मध्ये ऐतिहासिक ‘यूरो कप’चे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. जो देशाच्या फुटबॉल इतिहासातील एक सुवर्णक्षण मानला जातो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा हा निर्णय आपल्यासाठी अत्यंत कठीण होता, अशी भावना त्याने व्यक्त केली. तसेच, आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सातत्याने पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्याने मनापासून आभार मानले आहेत.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या संपूर्ण प्रवासाला उजाळा दिला आहे. आपल्या या दिगंत कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विजय पाहिल्याचे सांगत असतानाच, काही कठीण प्रसंग आणि पराभवांच्या वेदनाही त्याने चाहत्यांच्या समोर मांडल्या आहेत.
आपल्या आठवणींना उजाळा देताना रोनाल्डो म्हणाला, “काही दिवस आणि रात्री अशा अप्रतिम होत्या, ते विजय मी कधीही विसरू शकत नाही; तर काही पराभवांची सल आजही मनाला लागते. माझ्याकडून चुकाही झाल्या, मला वेदनाही सहन कराव्या लागल्या आणि अनेकदा अशी वेळही आली जेव्हा मी पोर्तुगालच्या जनतेला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देऊ शकलो नाही.






