फोटो सौजन्य - IndianPremierLeague
कोलकाता नाइट राइडर्स विरूध्द राजस्थान रॅायल्स सामन्याचा अहवाल : कोलकाता नाइट राइडर्स यांचा सामना आजच्या सामन्यात राजस्थान रॅायल्सविरूध्द पार पडला. या सामन्यात आंद्रे रसेलची दमदार खेळी पाहायला मिळाली. आजच्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सने राजस्थानला 1 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह केकेआरने गुणतालिकेमध्ये सहावे स्थान गाठले आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या संघाची निराशाजनक फलंदाजी केली आहे. कर्णधार रियान परागने धुव्वादार खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका.
राजस्थानच्या रॅायल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर वैभव सुर्यवंशी हा आजच्या सामन्यात फेल ठरला. यशस्वी जयस्वाल याने आज 21 चेंडूमध्ये 34 धावा केल्या यात त्याने 1 षटकार आणि 5 चौकार मारले. कुणाल सिंग राठोडला आज संघामध्ये त्याचबरोबर आयपीएलमध्ये पदापर्ण करण्याची संधी मिळाली होती पण तो संघासाठी मोठी खेळी खेळु शकला नाही. ध्रुव जुरेल आणि वानिंदु हसरंगा हे दोन्ही खेळाडु 0 धावा करुन बाद झाले. शिमरॉन हेटमायरने आजच्या सामन्यात त्याने संघासाठी चांगली खेळी खेळली.
Another day, another #TATAIPL classic 🤩@KKRiders prevail by 1️⃣ run in a last-ball thriller in Kolkata to boost their playoff hopes 👏💜
Scorecard ▶ https://t.co/wg00ni9CQE#KKRvRR pic.twitter.com/mJxuxBSPqw
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
आजच्या सामन्यात राजस्थान रॅायल्सचा कर्णधार रियान पराग याने कौतुकास्पद कामगिरी केली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. रियान परागने आजच्या सामन्यात त्याचे शतक हुकले पण तो संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरला. रियानने संघासाठी 45 चेंडूमध्ये 95 धावांची खळी खेळली, यामध्ये त्याने संघासाठी कमालीची खेळी खेळली. यामध्ये त्याने ८ षटकार आणि ६ चौकार मारले.
शिमरॉन हेटमायरने आजच्या सामन्यात त्याने 29 चेंडूमध्ये 23 धावा केल्या. शेवटच्या काही चेंडू शिल्लक असताना शिवम दुबे आणि जोफ्रा आर्चर हे फलंदाजी करत होते. शिवम दुबे याने संघासाठी 14 चेंडुमध्ये 25 धावा केल्या तर जोफ्रा आर्चर याने संघासाठी 8 चेंडूमध्ये 12 धावा केल्या पण संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजीची सांगायचे झाले तर मोईन अलीने संघासाठी २ विकेट्स घेतले. तर हर्षित राणाने संघाला २ विकेटची कमाई करून दिली. वरुण चक्रवर्ती याने त्याची जादू आजही दाखवली आणि संघाला २ विकेट्स मिळवून देण्यात यशस्वी झाला. वरून अरोडाने आजच्या सामन्यात खूप धावा दिल्या पण त्याच्या हाती देखील १ विकेट लागला.