फोटो सौजन्य - Lucknow Super Giants/Punjab Kings
पंजाब किंग्स विरूध्द लखनऊ सुपर जायंट्स टॅास अपडेट : पंजाब किंग्स विरूध्द लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आयपीएल 2025 चा 54 वा सामना रंगणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रियांश आर्याच्या फलंदाजीकडे असणार आहे, मागील सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने देखील चांगली फलंदाजी केली होती. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे तरच संघाच्या आशा जिवंत राहतील.
पंजाब किंग्सचा संघ सध्या पॅाइंंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यत 10 सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी 6 सामन्यात विजय मिळवला आहे तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यत 10 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 5 सामन्यात विजय मिळाला आहे तर 5 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे.
Framed in beauty. Fueled by intent. ❤️💙
A clash with a stunning backdrop and playoff tension in the air 🗻🏟️
Updates ▶️ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG | @PunjabKingsIPL | @LucknowIPL pic.twitter.com/lFW52TmYcC
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने एक बदल केला आहे, यामध्ये आजच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधुन बाहेर व्हावे लागले आहे. तर त्याच्या जागेवर मार्कस स्टाॅयनिसला संघामध्ये स्थान मिळाले आहे. तर लखनौ सुपर जायंट्सच्या संघामध्ये आकाश सिंहला संधी मिळाली आहे. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. एडन मार्कराम आणि निकोलस पूरन हे सध्या चांगल्या फॅार्ममध्ये आहेत पण मागील दोन सामन्यात त्याच्या बॅटमधुन धावा आल्या नाहीत.
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), जोश इंग्लिश, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टाॅयनिस, माकों यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अजमततुल्लाह उमरजाई
एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आकाश सिंह, दिग्वेश सिंग राठी, मयंक यादव, आवेश खान, प्रिन्स यादव