KKR vs RR: Big blow to Kolkata Knight Riders! Ajinkya Rahane suffers serious injury, question mark over playing in next match
KKR vs RR : अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढी गंभीर आहे की, त्याला सरावही करता येत नाही. त्यामुळे अजिंक्यला काही काळ विश्रांती दिली आहे. पण आता अजिंक्य पुढच्या सामन्यात खेळणार की नाही, याची माहिती समोर आली आहे. केकेआरचा आगामी सामना ४ मे या दिवशी रंगणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताला जखम झाली असून, त्यावर तीन टाके घालण्यात आले आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स संघाचे वैद्यकिय व्यवस्थापन रहाणेच्या दुखापतीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेणार आहे. डुप्लेसिसने फटकावलेला चेंडू लागला फाफ डुप्लेसिसने फटकावलेला चेंडू शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या रहाणेच्या हाताला लागला. चेंडू त्याच्या हाताला लागून मिडऑफला गेला. रहाणे तातडीने मैदानाबाहेर गेला होता. त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. बक्षीस समारंभाच्या वेळी तो मैदानात आला.
पत्रकार परिषदेत ‘कोलकाता’ संघाचा अष्टपैलू अनुकूल रॉय याने रहाणेच्या दुखापतीची तीव्रता सांगितली. रहाणेच्या हातावर टाके घालण्यात आले आहेत. ही दुखापत बरी होण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असे तो म्हणाला. ‘कोलकाता’ संघाची आगामी लढत ४ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकात्यात आहे. यापूर्वी रहाणेच्या अनुपस्थितीत सुनील नारायणने संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात केकेआरला विजय मिळवता आला.
हेही वाचा : शिखर धवनने शेअर केला सोफीसोबतच खास फोटो! केला मोठा खुलासा, म्हणाला – माझे…
पण केकेआरला जर आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवायचे असेल तर त्यांना पुढचे सामने जिंकणे भाग आहे. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. AMII अजिंक्यने आतापर्यंत केकेआरचे दमदार नेतृत्व केले आहे. पण त्याला चांगली साथ मात्र मिळालेली नाही. त्यामुळे केकेआरचे खेळाडू अजिंक्यला या पुढच्या सामन्यांत साथ देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आहे. मागील सामन्यात राजस्थानच्या संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु काल झालेल्या सामन्यात संघाने ऐनवेळी हाराकिरी केली. परिणामी मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह मुंबईने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवण्याची किमया साधाली. आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने २१७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थान संघ सर्वबाद ११७ धावाच करू शकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १०० धावांनी पराभूत केले. मुंबईकडून बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बूमराहने २ गडी बाद केले.