फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मिडीया
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा अहवाल : राजस्थान रॉयल्सचा सामना आज मुंबई इंडियन्सशी झाला, या सामन्याचे आयोजन त्यांच्या घरच्या मैदानावर करण्यात आले होते. मागील सामन्यात राजस्थानच्या संघाने चांगली कामगिरी केली होती पण संघाने आजच्या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत २ विकेट्स गमावून २१७ धावा केल्या होत्या. प्रतित्युत्तरात राजस्थानचा संघ फक्त १०० धावा करू शकला. आजचा सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १०० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात एकही राजस्थान रॉयल्सचा फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर चांगली कामगिरी करू शकला नाही.
आजच्या दोन्ही संघाची कशी कामगिरी राहिली आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर दीपक चाहर याने संघासाठी त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतला. मागील सामन्यात शतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी याला दुसऱ्याच चेंडूवर बाहेरचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराह याने संघासाठी त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये २ विकेट्स घेतले. बुमराहने राजस्थानचा कर्णधार रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट याने संघासाठी ३ विकेट्स घेतले. ट्रेंट बोल्टने आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल, नितीश राणा आणि जोफ्रा आर्चर यांना आज पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Match 50. Mumbai Indians Won by 100 Run(s) https://t.co/t4j49gX9NW #RRvMI #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
कर्ण शर्मा याने आज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना प्रभावित केले. त्याने आज संघासाठी ३ विकेट्स घेतले. कर्ण शर्मा याने आजच्या सामन्यात ध्रुव जुरेल, महेश तीक्षणा आणि कुमार कार्तिकेया याना बाहेरचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्याच्या हाती आजच्या सामन्यात एक विकेट लागला. यामध्ये त्याने शुभम दुबे याला आज त्याने बाहेरचा रस्ता दाखवला.
शिखर धवनने शेअर केला सोफीसोबतच खास फोटो! केला मोठा खुलासा, म्हणाला – माझे…
वैभव सूर्यवंशी – ० (२)
यशस्वी जैस्वाल – १३ (६)
नितीश राणा – ९ (११)
रियान पराग (कर्णधार) – १६ (८)
ध्रुव जुरेल (विकेटकिपर) – ११ (११)
शिमरोन हेटमायर – ० (१)
जोफ्रा आर्चर – ३० (२७)
महेश तिक्षना – २ (९)
कार्तिकेया सिंह – २ (४)
शुभम दुबे – १५ (९)
आकाश मधवाल – ४* (९)
मुंबईच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या दोघांनी संघासाठी अर्धशतक झळकवले. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी २३ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी खेळली. रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांचे तिसरे अर्धशतक या सीझनमध्ये झळकवले आहे. रोहित शर्माने संघासाठी ५३ धावांची खेळी खेळली. तर रायन रिकल्टन याने संघासाठी ६१ महत्वाच्या धावा केल्या. या मोठ्या फरकाच्या विजयासह मुंबईच्या संघाने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.