KKR vs SRH: Heinrich Klassen hits a century! He created 'this' history, became the first player to achieve such a record in IPL...
KKR vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. या सामन्यात एसआरएचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७८ धावांचा डोंगर उभा केला होता. क्लासिनचे शतक आणि हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर एसआरएचने २७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्स सर्वबाद १६८ धावाच करू शकला. परिणामी एसआरएचने ११० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनने शतक झळकावून इतिहास रचला आहे. क्लासेनने ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. तो सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज देखील बनला आहे.
क्लासेनने ट्रॅव्हिस हेडचा विक्रम मोडीत काढला आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना ट्रॅव्हिस हेडने ३९ चेंडूत शतक झळकावले होते. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा विक्रम केला होता. आता हेनरिक क्लासेनने ३७ चेंडूत ही कामगिरी करत हेडला मागे टाकले आहे.
१९ व्या षटकात हेनरिक क्लासेनने आपले शतक पूर्ण केले. क्लासेनने ३७ चेंडूचा सामना करत 100 धावा केल्या. वैभव अरोराच्या चेंडूवर डबल घेऊन त्याने आपले शतक पूर्ण केले. क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून युसूफ पठाणची बरोबरी साधली आहे. युसूफ पठाणने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ही कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने ३० चेंडूत शतक साकारले होते. त्यानंतर, त्याच हंगामात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावून अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले होते. तो सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय फलंदाज देखील बनला आहे. त्यानंतर आज हेनरिक क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून ही कामगिरी केली.
हेही वाचा : IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या..
शतक करण्यापूर्वी, क्लासेनने १७ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. तो सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूत दोनदा अर्धशतक पूर्ण केले आहे. तर अभिषेक शर्माने एकदा अर्धशतक झळकावले आहे. काल झालेल्या सामन्यात क्लासेनही १७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.