फोटो सौजन्य - बीसीसीआय
KL Rahul’s century against West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कालपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे या मालिकेचा पहिला सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्ये वेस्टइंडीजच्या सर्व फलंदाजांना बाद करून पहिली इनिंग संपवली. पहिले इनिंग मध्ये भारताच्या गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मोहम्मद सिराज याने संघासाठी चार विकेट्स घेतले तर जसप्रीत बुमराह याने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले.
भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी कमालीची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल यांनी संघासाठी 36 धावा केल्या तर केल राहुल दुसऱ्या दिवशी देखील नाबाद खेळत आहे. भारताचा स्टार सलामी वीर फलंदाज केएल राहुल याने शतक ठोकले आहे. केल राहुल याने भारतामध्ये त्याचे दुसरे शतक नावावर केले आहे. कालपासून त्याने त्याच्या कमालीच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकले आहेत. त्याने आता नवा रेकाॅर्ड नावावर केला आहे, एक वर्षामध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज आता केएल राहुल झाला आहे. त्याचबरोबर त्याने 9 वर्षानंंतर घरच्या मैदानावर शतक ठोकले आहे.
Test hundred No. 1⃣1⃣ for KL Rahul 💯 The opener continues his sublime form 👏#TeamIndia have gone past 200 runs. Updates ▶ https://t.co/MNXdZcelkD#INDvWI | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/c69vJbFFVD — BCCI (@BCCI) October 3, 2025
भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर साई सुदर्शन हा स्वस्तात बाद झाला. साई सुदर्शनची मागील काही सामन्यांमध्ये फार काही चांगली कामगिरी राहिली नाही त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यांमध्ये फक्त सात धावा करून विकेट गमावली. तर भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अर्धशतक ठोकले यामध्ये त्यांनी पाच चौकार मारले. शुभमन गिलचा विकेट गेल्यानंतर आता केएल राहुलची साथ द्यायला ध्रुव जुरेल फलंदाजीला आला आहे. भारताच्या संघाने दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यामध्ये आघाडी घेतली आहे.
भारताच्या गोलंदाजांनी पहिल्याच दिनी कमालीची कामगिरी केली होती. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज याने संघासाठी 4 विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजला लवकर रोखले त्यानंतर जसप्रीत बुमराहने देखील संघाला 3 विकेट्ची कमाई करुन दिली. भारताच्या दमदार गोलंदाजीमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाची फलंदाजी पुर्णपणे फेल ठरली. कुलदीप यादव याने भारतीय प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन केले त्याने पहिल्याच दिवशी दोन फलंदाजांना बाद केले.