फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sai Sudarshan’s journey in IPL 2025 : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात गुजरातच्या संघाने हैदराबादला ३८ धावांनी पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये दुसरे स्थान गाठले आहे. गुजरातचा संघ या सीझनमध्ये कमालीचा खेळ दाखवत आहे यामध्ये मोलाचा वाटा म्हणजेच संघाचे पहिले तीन फलंदाज. गुजरातच्या संघासाठी शुभमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शन यांच्या दमदार खेळीने संघाला चांगल्या स्थितीत उभे केले आहे. गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याच्यासाठी हा सिझन एक स्वप्नहून कमी नाही त्याने कालच्या सामन्यात संघासाठी आणखी एकदा कमालीची खेळी खेळली.
साई सुदर्शनने संघाला आयपीएल २०२५ मध्ये मजबूत सुरुवात करून दिली आहे. २३ वर्षीय या खेळाडूने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काल म्हणजेच २ मे रोजी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात त्याने ४८ धावांची खेळी खेळली आहे. यासह त्याने या सीझनमध्ये ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने संघासाठी आतापर्यंत १० सामने खेळले आहेत यामध्ये त्याने ५०४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या पाच अर्धशतकाचा समावेश आहे. या सीझनमध्ये १० सामन्यात साई सुदर्शन याने संघासाठी कशी कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.
पाक क्रिकेट खेळाडूने पाकिस्तनी आर्मीवर साधला निशाणा! म्हणाला – सैन्याने चालवलेले घाणेरडे…
गुजरात टायटन्सचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला होता. यामध्ये साई सुदर्शनने आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात ७४ धावांची खेळी खेळली होती हे त्यांचे पाहिले अर्धशतक होते. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६३ धावांची आणखी एकदा मजबूत खेळी खेळून चाहत्यांचे लक्ष वेधले होते त्याचबरोबर त्याने सलग दुसऱ्या सामन्यात दुसरे अर्धशतक झळकावले होते. गुजरात टायटन्सचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झाला या सामन्यात त्याने ४९ धावांची मजबूत खेळी खेळली होती. हैदराबाद विरुद्ध तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला होता यावेळी त्याने फक्त ५ धावा केल्या होत्या.
SaiSu breaking records for fun is our favourite genre! 😍 pic.twitter.com/tqaSi2yNLk
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2025
त्यानंतर त्याने त्याचा फॉर्म परत मिळवला आणि मागील सामन्याची भरपाई ९ एप्रिल रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात केली होती. राजस्थान रॉयलविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये साई सुदर्शनने संघासाठी ८२ धावांची खेळी खेळली होती. या त्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक इनिंगमधील एक आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये साईने ५६ धावा केल्या आहेत. १९ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता यामध्ये त्याने संघासाठी ३६ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध साई सुदर्शनने ५२ धावांची खेळी खेळली होती. मागील सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध झाला होता यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये साई सुदर्शनने ३६ धावा केल्या होत्या.