फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हार्दिक पांड्या – नीरज चोप्रा : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या त्याच्या कामगिरीमुळे आणि त्याच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतो. त्याचबरोबर नुकताच त्याने एक नवा बिझनेस सुरु केला आहे. त्याचबरोबर भारताचे स्टार ॲथलेटिक्स नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये केलेल्या कामगिरीमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांनी भारताला गौरव मिळवून दिले होते. नीरजने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, तर नेमबाजीची राणी मनू भाकरने दोन कांस्यपदके जिंकली. मनू तिचे तिसरे कांस्यपदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर होती. आता रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टाकलं आहे असं चित्र दिसत आहे.
हेदेखील वाचा – नीरज चोप्रा पुन्हा असणार ॲक्शनमध्ये! कधी आणि कुठे पाहता येणार गोल्डन बॉयला लाईव्ह?
भारताची स्टार शुटर मनु भाकर भारतामध्ये परतल्यानंतर तिला अनेक राजकीय पक्षांनी त्याचबरोबर सरकारने लाखोंचे चेक दिले आणि तिचा सत्कार केला आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अजुनपर्यत भारतामध्ये परतला नाही त्यामुळे ज्यांना कांस्यपदक मिळाले आहे त्यांच्याहून अधिकच त्याला बक्षीस रक्कम देण्यात येईल असा अंदाज लावला जात आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, आर्थिक सल्लागार फर्म क्रॉलच्या आकडेवारीवर आधारित, नीरज चोप्राच्या मूल्यात मोठी वाढ होणार आहे. अहवालानुसार, नीरजचे मूल्य US $ 29.6 दशलक्ष (सुमारे 248 कोटी भारतीय रुपये) वरून US $ 40 दशलक्ष (सुमारे 330 कोटी भारतीय रुपये) पर्यंत वाढेल. या अहवालामध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचे मूल्य (पैसा) हार्दिक पांड्याच्या बरोबरीचे होते, परंतु नीरज आता हार्दिक पांड्याला मागे सोडेल अशी अपेक्षा आहे. सध्या नीरज हा भारतातील सर्वात मौल्यवान खेळाडूंपैकी एक आहे.
मनु भाकरने तिच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अलीकडेच एका सॉफ्ट ड्रिंकसोबत 1.5 कोटी रुपयांचा करार केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर शूटिंग क्वीनच्या फीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिने KFC सोबत देखील करार केला आहे, यासंदर्भात तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनू करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुमारे 25 लाख रुपये आकारत होती, जी आता वाढली आहे.