फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नीरज चोप्रा : भारताचा स्टार नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटरचा भाला फेकून दुसरे स्थान गाठले आणि सिल्वर मेडल नावावर केले. नीरज चोप्रा हा असा एकमेव ॲथलेटिक्स आहे ज्याने ट्रक ॲथलेटिक्समध्ये दोन पदक मिळवणारा आणि सुवर्ण पदक नावावर करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आता भारतीय चाहत्यांचा प्रश्न आहे की, नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये कधी दिसणार आहे? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी नीरज चोप्रा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. यावेळी नीरज स्वित्झर्लंडच्या लॉसने डायमंड लीग २०२४ मध्ये सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे.
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा सर्वात्तम थ्रो ८९.४५ मीटरचा केला परंतु त्याला सुवर्ण पदक मिळवता आले नाही. यावेळी शेजारील देश म्हणजेच पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अरशद नदीमने ९२.९७ मीटर फेकून ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला आणि सुवर्ण पदक नावावर केले आहे.
नीरज चोप्रा गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट रोजी लॉसने डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. नीरज चोप्राचा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री २२ :२२ वाजता (23 ऑगस्ट) पहायला मिळेल.
स्पोर्ट्स १८ च्या माध्यमातून तुम्ही टीव्हीवर नीरज चोप्राची ॲक्शन लाईव्ह पाहू शकाल. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema ॲप आणि वेबसाइटवर असेल.
नीरज चोप्राने बऱ्याचदा सांगितले आहे की, त्याला ९० मीटरचा टप्पा पार करायचा आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकनंतर सुद्धा त्याने त्याच्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याने बरेच प्रयत्न केले आहेत की, तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९० मीटर अंतर पार करेल परंतु ते अजुनपर्यत शक्य झाले नाही. लॉसने डायमंड लीग ही हंगामातील शेवटची डायमंड लीग असेल. यानंतर, नीरज सुमारे २ महिन्यांचा ब्रेक घेईल, या दरम्यान त्याच्या कंबरेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते.