Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Quota: खेळाडूंसाठी मोठी बातमी! ५ टक्के आरक्षणाकरिता ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली

या प्रणालीद्वारे खेळाडूंना डिजिटल पडताळणीसह प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर असलेल्या QR कोडमुळे प्रमाणपत्राची सत्यता संबंधित नियुक्ती प्राधिकरण त्वरित तपासू शकतील.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 03:44 PM
Krida E-Praman portal, Sports quota verification Maharashtra,

Krida E-Praman portal, Sports quota verification Maharashtra,

Follow Us
Follow Us:
  • क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने एक क्रांतिकारी पाऊल
  • ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली
  • या तंत्रज्ञानामुळे प्रमाणपत्रांमधील फेरफार रोखणे शक्य होणार
Pune News: गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी अधिक पारदर्शक आणि जलद करण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रमाणपत्रांमधील फेरफार रोखणे शक्य होणार असून, खेळाडूंना विनासायास आरक्षणाचा लाभ घेता येईल.

या प्रणालीद्वारे खेळाडूंना डिजिटल पडताळणीसह प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर असलेल्या QR कोडमुळे प्रमाणपत्राची सत्यता संबंधित नियुक्ती प्राधिकरण त्वरित तपासू शकतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंनी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

PMC Road Mitra App: खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेचे PMC Road Mitra अॅप बंद

खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घ्यावे, त्याचप्रमाणे जर एखाद्या खेळाडूची माहिती प्रणालीवर उपलब्ध नसल्यास support@kridaepramaan.org या ई-मेलवर स्पर्धेचे नाव, वर्ष आणि प्रमाणपत्राची स्कॅन प्रत पाठवून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर विभागस्तरावर पडताळणी करून अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.

सद्यस्थितीत कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. इतर खेळांचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेल्या खेळाडूंनी देखील पुढील भरती प्रक्रियेसाठी या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.

‘माझ्या वडिलांना वर्ल्ड कपपेक्षा माझी जास्त गरज होती’, T20 World Cup 2026 नंतर स्टार क्रिकेटरचे धक्कादायक विधान

ब्लॉकचेन तंत्रज्ञान: प्रमाणपत्रांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी अत्याधुनिक ब्लॉकचेनचा वापर.

५ टक्के आरक्षण: शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमधील खेळाडूंच्या आरक्षणाची प्रक्रिया सुलभ होणार.

पारदर्शकता व वेग: मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे पडताळणी प्रक्रियेला वेग येईल आणि भ्रष्टाचार थांबेल.

 

 

 

Web Title: Krida e praman maharashtra launches blockchain system for sports quota verification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports

संबंधित बातम्या

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
1

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.