PMC Road Mitra App: खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेचे PMC Road Mitra अॅप बंद
महत्त्वाची बाब म्हणजे, महापालिकेच्या महिती आणि तंत्रज्ञान विभगाला आणि पथ विभागालाही हे अॅप बंद पडल्याची कोणतीही माहिती नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची किती दुरावस्था झाली आहे हे समोर आले आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या अॅपचे अनावरण करण्यात आले होते.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईल ॲपवर अपलोड केल्यास, केवळ ७२ तासांत ते खड्डे बुजवले जातील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. या नव्या व्यवस्थेमुळे खड्डेमुक्तीच्या कामात पारदर्शकता आणि वेग येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांची रांग; राष्ट्रवादीत अंतर्गत चुरस
नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढून अॅपवर अपलोड केल्यास, ती तक्रार कोणतीही मध्यस्थी न होता थेट महापालिकेच्या पथ विभागाकडे (Road Department) पोहोचेल. तक्रार प्राप्त झाल्यापासून केवळ ७२ तासांच्या आत संबंधित खड्डा बुजवला जाईल, असा ठाम दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. खड्डा बुजविण्याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित भागाच्या उपअभियंत्यावर (Deputy Engineer) देण्यात आली होती. पण हे अॅपच बंद पडल्यामुळे नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम निष्क्रिय ठरल्याचे दिसत आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलतना पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, “अॅप बंद पडल्याचे समजल्यानंतर संबंधित विभागांना ते अॅप सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नागरिकांसाठी हे अॅप लवकरच सुरू केले जाईल.”






