Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

आईला नको होतं ते मूल अशी एकेकाळी भीषण गरिबीमुळे हतबलता असणाऱ्या क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या पराकोटीच्या संघर्षाने आणि न डगमगणाऱ्या जिद्दीने इतिहास घडवला आहे. जीवघेण्या आजारावर आणि गरिबीवर मात करत त्याने स्वतःचे अब्जाधीशाचे साम्राज्य उभे केले असून, आज तो जगातील सर्वात महान आणि श्रीमंत फुटबॉलपटू म्हणून पूर्ण जगावर राज करत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 23, 2026 | 04:16 PM
फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
Follow Us
Follow Us:

फुटबॉलच्या इतिहासात कित्येक खेळाडू आले आणि गेले ज्यांनी आपल्या कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली पण काही नावे अशी असतात जी केवळ एक खेळाडू म्हणून नाही तर गरिबी, पराकोटीचा संघर्ष आणि न डगमगणाऱ्या जिद्दीचे प्रतीक म्हणून अजरामर होतात. आज जगातील सर्वात श्रीमंत, यशस्वी आणि अफाट लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला असाच एक महान चेहरा म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो ज्याला जग ‘CR7’ म्हणून ओळखतं. आज कोट्यवधी डॉलर्सच्या साम्राज्यात राहणाऱ्या रोनाल्डोचा इथपर्यंत पोहोचण्याचा इतिहास अत्यंत वाईट परिस्थितीतून आणि थरारक राहिलेला आहे. ज्या मुलाला जन्माआधीच या जगात नाकारण्याचा प्रयत्न झाला होता, त्याने आपल्या कष्टाच्या जोरावर संपूर्ण जगाला स्वतःच्या पायावर कसं झुकवलं, ही आहे रोनाल्डोची गोष्ट.

जन्म, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आईचा तो कठीण निर्णय

या जागतिक महानायकाची सुरुवात पोर्तुगालच्या मडेयरा बेटावरील एका अत्यंत गरीब आणि पत्र्याच्या घरातून झाली जिथे ५ फेब्रुवारी १९८५ रोजी रोनाल्डोचा जन्म झाला. त्याची आई मारिया डोलोरेस दुसऱ्यांच्या घरात आचारी म्हणून काम करायची तर वडील डिनिस अवीयरो हे बागेची कामं करायचे. रोनाल्डोच्या जन्माआधीच हे कुटुंब आधीच प्रचंड गरिबीशी आणि उपासमारीशी झगडत होतं, त्यात भर म्हणजे त्याचे वडील दारूच्या आहारी गेले असल्यामुळे घरात नेहमीच पैशांची चणचण असायची. जेव्हा मारिया यांना चौथ्यांदा गर्भधारणा झाली, तेव्हा घरची ही भीषण परिस्थिती पाहून सुदैवाने की दुर्दैवाने त्यांनी या बाळाला जन्म न देण्याचा म्हणजेच गर्भपाताचा निर्णय घेतला होता. त्यांनी डॉक्टरांकडे तशी मागणीही केली होती पण डॉक्टरांनी त्याला साफ नकार दिला आणि अखेर परिस्थितीपुढे हतबल होऊन मारिया यांनी ज्या मुलाला जन्माला घातले, तोच मुलगा पुढे जाऊन पूर्ण फुटबॉल जगताचा राजा बनला.

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

बालपणीची गरिबी, हृदयविकारावर मात आणि मँचेस्टर युनायटेडमध्ये झालेला प्रवेश

रोनाल्डोचे बालपण एका लहानशा पत्र्याच्या घरात गेले जिथे त्याला त्याच्या इतर तीन भावंडांसोबत एकच छोटी खोली शेअर करावी लागायची आणि अनेकदा रात्री उपाशी झोपण्याची वेळ यायची. त्याचे वडील ज्या स्थानिक क्लबमध्ये किट-मॅन म्हणून काम करायचे, तिथेच रोनाल्डोने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून फाटलेले बूट घालून फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती.

वयाच्या १५ व्या वर्षी त्याला ‘रेसिका हार्ट’ नावाचा दुर्मिळ आजार झाला ज्यामुळे खेळताना त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढायचे आणि त्याच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता, पण एका कठीण लेझर शस्त्रक्रियेनंतर तो पुन्हा मैदानात उतरला. स्थानिक क्लब कडून खेळताना त्याच्या खेळातील जबरदस्त वेग पाहून पोर्तुगालच्या ‘स्पोर्टिंग सीपी’ क्लबने त्याला आपल्या संघात घेतले आणि २००३ मध्ये मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या एका सामन्यात त्याच्या कौशल्याने दिग्गज मॅनेजर सर ॲलेक्स फर्ग्युसन यांचे लक्ष वेधून घेतले ज्यांनी तातडीने त्याला आपल्या संघात घेऊन ऐतिहासिक ‘नंबर ७’ ची जर्सी दिली.

प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव

जागतिक विक्रम, अब्जाधीशाचे साम्राज्य आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा

मँचेस्टर युनायटेडनंतर रोनाल्डोने रिअल माद्रिद, युव्हेंटस आणि अल-नासर सारख्या जगातील सर्वात मोठ्या क्लब्सचे प्रतिनिधित्व करत यशाची सर्व शिखरे पादाक्रांत केली. त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल ५ वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार जिंकला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. एकेकाळी एका जेवणासाठी मोताद असलेला हा मुलगा आज जगातील पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू बनला असून त्याचे स्वतःचे भव्य हॉटेल्स, कपड्यांचे ब्रँड्स, खाजगी जेट विमाने आणि जगातील सर्वात महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. ज्या मुलाला जन्माआधीच नकोसं मानलं गेलं होतं, त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून स्वतःचं जे साम्राज्य उभं केलं, ते आजच्या पिढीसाठी इतिहास घडवण्याचे एक जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.

 

Web Title: Cristiano ronaldo life story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • marathi
  • Sports

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.