Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीआर श्रीजेशचा उत्तराधिकारी मिळाला; एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय हॉकी टीमचा कृष्ण पाठक असणार गोलकीपर

Krishan sreejesh : भारतीय संघाला आता पीआर श्रीजेशच्या जागी नवीन उत्तराधिकारी मिळणार आहे. पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर आता भारतीय हॉकी संघाचा मुख्य गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला बनवण्यात आले आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 सप्टेंबर रोजी चीन विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर जपान (9 सप्टेंबर), मलेशिया (11 सप्टेंबर), कोरिया (12 सप्टेंबर) आणि पाकिस्तान (14 सप्टेंबर). सेमीफायनल 16 सप्टेंबरला तर फायनल 17 सप्टेंबरला होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 28, 2024 | 04:18 PM
Krishan Pathak will be The New Goalkeeper of Indian Hockey Team in Asian Champions Trophy So PR Sreejesh Successor found

Krishan Pathak will be The New Goalkeeper of Indian Hockey Team in Asian Champions Trophy So PR Sreejesh Successor found

Follow Us
Close
Follow Us:

Krishan Sreejesh Became a Goalkeeper of Team India : पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर, आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय हॉकी संघाचा मुख्य गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला बनवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 8 ते 17 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर श्रीजेशने हॉकीला अलविदा केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टँडबाय गोलकीपर असलेला पाठक आता मुख्य गोलकीपर असेल तर सूरज करकेरा राखीव गोलकीपर असेल.
विवेक सागर प्रसाद बनला उपकर्णधार
अनुभवी मिडफिल्डर विवेक सागर प्रसादला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. नियमित उपकर्णधार हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या नवोदित ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंग ज्युनिअरसाठीही ही सुवर्णसंधी असेल. प्रो लीगमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. अरिजितसिंग हुंदल हा संघातील तिसरा ड्रॅग फ्लिकर असेल. बचावाची जबाबदारी जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि सुमित यांच्यावर असेल. मिडफिल्डमध्ये राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद राहिल असतील. फॉरवर्ड लाइनमध्ये अभिषेक, सुखजित सिंग, हुंडल, ज्युनियर संघाचा कर्णधार उत्तम सिंग आणि गुरज्योत सिंग यांचा समावेश असेल.
ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्यानंतरची पहिली परीक्षा
पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या संघातील दहा सदस्य या संघात आहेत. हॉकी इंडियाने जारी केलेल्या निवेदनात प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, ‘ही आमच्यासाठी महत्त्वाची स्पर्धा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून आनंदोत्सव साजरा करून संघ कॅम्पमध्ये परतला आहे. संघाला प्रचंड प्रेम मिळाल्याने गेले काही आठवडे छान गेले. भविष्यातही हा पाठींबा कायम राहील अशी आशा आहे. नवीन ऑलिम्पिक सायकल आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीने सुरू होत असून आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत.
भारतीय हॉकी संघ
हा आहे भारतीय संघ, गोलरक्षक: कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा, बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि सुमित, मिडफिल्डर: राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद राहिल , फॉरवर्ड: अभिषेक, सुखजित सिंग, अरिजित सिंग हुंदल, ज्युनियर संघाचा कर्णधार उत्तम सिंग आणि गुरजोत सिंग मुख्य प्रशिक्षक: क्रेग फुल्टन

 

Web Title: Krishan pathak will be the new goalkeeper of indian hockey team in asian champions trophy so pr sreejesh successor found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • Asian Champions Trophy
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी 
1

Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी 

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 
2

Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडूंचे मनोमिलन; मनदीप सिंग आणि उदिता कौर अडकले विवाहबंधनात… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.