
Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, 'या' संघाला दाखवला घरचा रस्ता
भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स 2026 (Asian-games) मध्ये आपली शानदार कामगिरी कायम राखली. भारतीय संघाने गुरुवारी एकतर्फी सामन्यात साउथ कोरियाचा 8-2 असा दणदणीत पराभव केला.
हा भारताचा सलग तिसरा विजय आहे. भारताने स्पर्धेच्या सुरुवातीला इंडोनेशियाविरुद्ध 13-1 अशी धमाकेदार विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेचा काटा 16-1 असा काढला. आता भारतीय संघाने साउथ कोरियाला घरचा रस्ता दाखवला आहे. साउथ कोरियाविरुद्ध भारतीय संघाने आपला पहिला गोल चौथ्या मिनिटाला केला. शिलानंद लाकराने भारतासाठी हा पहिला गोल केला.
सामन्यातील 10 व्या मिनिटाला सुखजीत सिंगने भारताची आघाडी दुप्पट केली. पहिल्या दहा मिनिटांत दोन गोल झाल्याने साउथ कोरियाचे डिफेंडर्स पूर्णपणे दबावात दिसले, ज्याचा फायदा भारताचा कर्णधार हरमप्रीत सिंगने घेतला सामन्याच्या 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर गोल केला. त्याने भारताचा तिसरा गोल केला. पहिल्या क्वार्टरचा शेवट होता होता अभिषेकने चौथा गोल करत भारताची आघाडी चौपट केली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये साउथ किरोयाच्या डिफेन्सने जोर लावला, सुरुवातीला भारतीय संघाला कोणतीच संधी दिली नाही. दरम्यान, सामन्याच्या 26 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंग प्रतिस्पर्धी संघाचा डिफेन्स भेदण्यास यशस्वी राहिला व त्याने भारताची लीड 5-0 अशी केली. त्याच्या सहा मिनिटानंतर दिलप्रीतने आपला दुसरा आणि भारतासाटी 32 व्या मिनिटाला सहावा गोल केला.
भारताच्या आक्रमकतेसमोर साउथ कोरियाने अक्षरशः घुडघे टेकले होते, त्यामुळे त्यांच्या डिफेन्सला पुन्हा एकदा अभिषेकने भेदले व भारतीय संघासाठी सातवा गोल केला.
Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze
महत्त्वाचे म्हणजे, साउथ कोरियाने सामन्याच्या शेवटपर्यंत पराभव पत्कारला नाही व त्यांनी चांगली झुंज दिली. त्यांच्यावतीने सामन्याच्या 42 व्या मिनिटाला पहिला गोल किम जेहोने केला. त्यानंतर 10 व्या मिनिटानंतर कोरियाच्या वतीने दुसरा गोल किम याँग बोकने केला.
शेवटच्या क्वॉर्टरमध्ये भारतासाठी आठवा गोल राजिंदर सिंगने केला आणि भारताच्या आणखीन एका दमदार विजयाचा शिक्कामोर्तब केला. भारताला आता पुढील सामना 26 सप्टेंबरला जपानविरुद्ध खेळायचा आहे.