फोटो सौजन्य - X
कुसल मेंडिस : आयपीएल 2025 महासंग्राम पुन्हा एकदा काही तासांमध्ये सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे दहा दिवसांसाठी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. सध्या आयपीएलचे 13 साखळी सामने शिल्लक आहेत, त्याचबरोबर क्वालिफायरचे तीन सामने आणि फायनलचा एक सामना असे मिळून चार सामने म्हणजेच एकूण 17 सामने अजूनही खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही रविवारी म्हणजेच 25 मे रोजी आणि 17 मे रोजी प्रत्येकी दोन दोन सामने खेळवले जाणार आहेत.
17 मे रोजी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळू यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत, कारण की दहा दिवस स्पर्धा स्थगित झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेजारील देशांमध्ये देखील स्पर्धा सुरू होती. पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग म्हणून स्पर्धा खेळवली जाते ही स्पर्धा देखील या तणावाच्या वातावरणामुळे स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानमधून अनेक परदेशी खेळाडूंनी पळ काढला आहे. आता आयपीएलमध्ये उर्वरित सामन्यांमध्ये एक परदेशी खेळाडू हा पीएसएलमध्ये न खेळता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.
आता आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या खेळाडूने पीएसएल सोडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसने पाकिस्तान सुपर लीग २०२५ सोडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान तणावापूर्वी कुसल मेंडिस पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत होता. तो क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत होता.
Kusal Mendis has left PSL due to safety concerns in Pakistan.
– He’s joined Gujarat Titans. pic.twitter.com/qNawAgxCNL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 16, 2025
तथापि, आता जीटीने त्याला जोस बटलरच्या जागी त्यांच्या संघाचा भाग बनवले आहे. इंग्लंडच्या वतीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत सहभागी होणार असल्याने जोस बटलर २६ मे रोजी जीटी कॅम्प सोडेल. जोस बटलर इंग्लंडला रवाना झाल्यानंतर मेंडिस जीटीकडून खेळेल. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, सुरक्षेच्या कारणास्तव मेंडिसने पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे.
मेंडिस पीएसएलमध्ये उत्तम फॉर्ममध्ये होता. त्याने ८ सामन्यांपैकी ५ डावात १६८ च्या स्ट्राईक रेटने १४३ धावा केल्या. कुसल पहिल्यांदाच आयपीएल खेळण्यास सज्ज आहे. गेल्या पाच डावांमध्ये मेंडिसने ३२, ३६, १२, २८ आणि ३५ नाबाद धावा केल्या आहेत.