फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयपीएल (Indian Premier League) सुरू करणारे ललित मोदी मागिल काही दिवसांपासून त्यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर सातत्याने चर्चेत आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये 17 वर्ष जूना हरभजन सिंह आणि श्रीसंत याचा व्हायरल केला होता. त्यानंतर ललित मोदींवर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्याचबरोबर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर श्रीसंतच्या पत्नीने त्याच्यावर सोशल मिडियावर टीका करुन खडेबोल सुनावले होते. आता त्यांनी आणखी एक रहस्य उघड केले आहे. त्यांनी सांगितले की २००८ मध्ये जेव्हा पहिला आयपीएल सामना खेळला गेला तेव्हा त्यांनी अनेक नियम मोडले होते.
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) यांच्यात खेळवण्यात आला होता. त्यावेळी आयपीएलच्या यशाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. पहिला सामना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तरच लीग यशस्वी होईल असा ललित मोदींचा विश्वास होता. त्यावेळी आयपीएलचे प्रसारण हे सोनी वाहिनी करत होती. पण या वाहिनीकडे सामना सर्वत्र दाखवण्यासाठी पुरेसे मोठे नेटवर्क नव्हते. यामुळे मोदींनी ठरवले की ते सर्व वाहिन्यांवर सामना प्रसारित करू देतील, जरी त्यासाठी त्यांना कराराचे नियम मोडावे लागले तरी.
खरं तर, ललित मोदींनी स्वतः मायकल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते की सोनीने त्यांना इशारा दिला होता की हे नियमांविरुद्ध आहे आणि यासाठी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाईल, परंतु त्यांनी उत्तर दिले की आधी सामना दाखवा आणि नंतर खटला दाखल करा. या निर्णयामुळे पहिले आयपीएल सामने खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि सुरुवातीपासूनच लीगला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
तथापि, या निर्णयामुळे अनेक वादही निर्माण झाले. २००९ मध्ये ललित मोदींवर सोनी आणि इतर भागीदारांसोबतचा करार मोडल्याचा, वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपला फायदा पोहोचवल्याचा आणि अनेक कायदेशीर अनियमितता केल्याचा आरोप होता. नंतर, मॅच फिक्सिंग, बेकायदेशीर सट्टेबाजी अशा अनेक वादांमुळे मोदींना आयपीएल कमिशनर पदावरून काढून टाकण्यात आले.
हुक्काच्या विधानावर इरफान पठाणने सोडले मौन! म्हणाला – ‘धोनी आणि मी एकत्र बसून…’
ललित मोदी यांनी एक नवीन करार केला, ज्या अंतर्गत सोनीला पुन्हा २०१७ पर्यंत प्रसारण हक्क देण्यात आले. हा करार सुमारे १.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८२०० कोटी रुपये) किमतीचा होता. या करारात वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप (WSG) ला त्यांचे दावे सोडण्याच्या बदल्यात सुमारे ४२५ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली. येथूनच वाद सुरू झाला.
बीसीसीआयने आरोप केला की मोदींनी त्यांच्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन करार बदलला आणि WSG ला फायदा करून दिला. हे प्रकरण वाढत गेले आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी सुरू केली. ललित मोदी विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांमध्ये हे आरोप आणि तपास अजूनही सुरु आहेत.