फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण मागील काही दिवसांपासून तो वादात आढळला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ते चांगलेच महागात पडले होते, त्याने मागिल एका मुलाखतीमध्ये त्याने शाहीद अफ्ररिदीवर देखील टीका केली यावेळी त्याला सोशल मिडियावर समर्थन मिळाले होते. पणआता त्याने एम एस धोनीवर देखील टीका केली होती. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एमएस धोनीच्या हुक्का ओढण्याबद्दल दिलेले विधान पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. पठाणने धोनीच्या हुक्का ओढण्याच्या सवयीबद्दल विनोदाने बोलले होते पण पाच वर्षांनंतर त्याची टिप्पणी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर झालेल्या अनेक वादांनंतर, इरफान पठाणने अखेर आपले मौन सोडले आहे आणि आपली बाजू मांडली आहे. इरफान पठाण २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता, जिथे तो अंतिम सामन्यात सामनावीरही होता. इरफानने २०२० मध्ये निवृत्ती घेतली. इरफान पठाणचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की धोनी हुक्का ओढतो आणि त्यात त्याच्यासोबत येणाऱ्यांना जास्त महत्त्व देतो.
सोशल मीडियावर इरफान पठाणच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी धोनीवर संघ निवडीमध्ये पक्षपाती असल्याचा आरोप केला, तर काहींनी पठाणवर माजी कर्णधाराची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. मोहम्मद शमीच्या वाढदिवसाच्या पोस्टवर एका युजरने लिहिले, “पठाण भाई, त्या हुक्क्याचे काय झाले???” यावर पठाणने उत्तर दिले, “धोनी आणि मी एकत्र बसून धूम्रपान करू.”
Mein or @msdhoni sath Beth kar pienge;)
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 3, 2025
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना पठाणने विचारले की हे चाहत्यांचे युद्ध आहे की जनसंपर्क अजेंडा आहे. इरफान पठाणने एक्स वर लिहिले, “५ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे, तेही विधान विकृत पद्धतीने सादर केले गेले आहे. चाहत्यांचे युद्ध? जनसंपर्क लॉबी?” त्या मुलाखतीत इरफान पठाण म्हणाला होता, “कोणाच्या खोलीत जाऊन हुक्का बनवणे किंवा त्याबद्दल बोलणे ही माझी सवय नाही. सर्वांना माहिती आहे. कधीकधी तुम्ही त्याबद्दल बोलले नाही तर ते चांगले असते. क्रिकेटपटूचे काम मैदानावर चांगली कामगिरी करणे असते आणि मी यावर लक्ष केंद्रित करायचो.”