फोटो सौजन्य - Hockey India सोशल मिडिया
भारत विरुद्ध मलेशिया : भारत विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सुपर 4 चा सामना पार पडला या सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये बरोबरी झाली आणि दोन्ही संघाना 1-1 गुण मिळाला आहे. यामध्ये सध्या भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मलेशियाचा संघ आहे, या स्पर्धेमध्ये मलेशियाच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे, तर पहिल्या गटामधून भारताचा संघ चांगली कामगिरी करत आला आहे, संघाने आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही. सुपर 4 मधील सर्व सामने भारतीय संघासाठी महत्वाचे आहेत.
बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळला जात आहे. भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी सुरूच आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार खेळत आहे. ३ सप्टेंबर रोजी सुपर ४ मध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध खेळलेला सामना भारताने २-२ असा बरोबरीत सोडवला. यानंतर, भारतीय संघ आता ४ सप्टेंबर रोजी सुपर ४ चा दुसरा सामना खेळेल.
४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ सुपर-४ मध्ये मलेशियाशी सामना करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. सुपर-४ मधून पुढे जाण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तथापि, भारतीय संघ देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे, कारण भारताने लीग टप्प्यात खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्व सामने जिंकले.
हुक्काच्या विधानावर इरफान पठाणने सोडले मौन! म्हणाला – ‘धोनी आणि मी एकत्र बसून…’
हॉकी आशिया कप २०२५ च्या लीग स्टेजमध्ये भारताने आपला पहिला सामना चीनविरुद्ध खेळला. भारताने चीनविरुद्ध ४-३ असा विजय मिळवला. त्यानंतर भारताने जपानविरुद्ध शानदार कामगिरी केली आणि सामना ३-२ असा जिंकला. त्याच वेळी, १ सप्टेंबर रोजी कझाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या सामन्यात भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सामना १५-० असा जिंकला. या सामन्यात अभिषेकने सर्वाधिक ४ गोल केले. याशिवाय सुखजीतनेही ३ गोल केले.