Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताजी ICC Test Rankings जाहीर! टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला फटका! जोचे अव्वल ‘रूट’ कायम

आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग घोषित करण्यात आली आहे.  यावेळी, भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन  पोहोचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 08, 2025 | 06:03 PM
Latest ICC Test Rankings announced! Team India's star batsman suffers a blow! Joe Root remains at the top.

Latest ICC Test Rankings announced! Team India's star batsman suffers a blow! Joe Root remains at the top.

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग जाहीर
  • इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अव्वल स्थानी कायम 
  • भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे
 ICC Test Rankings :  आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे.  यावेळी, बऱ्याच काळानंतर, अव्वल स्थानांवर काही एक हालचाल झाल्याचे दिसून आले नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान आयसीसीने ही नवीन रँकिंग जाहीर केली गेली आहे. पहिल्या कसोटीत भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालची बॅट  काही चालली नाही, ज्यामुळे त्याच्या रँकिंगवर मोठा परिणाम दिसून आला आहे. टॉप १० मध्ये मोठे बदल झालेले नसले तरी, काही खेळाडूंनी त्यांच्या स्थानात सुधारणा केली आहे.

हेही वाचा : ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची

जो रूटने अव्वल स्थान अबाधित

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने पुन्हा एकदा आपली जादू कायम राखत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान जपले आहे.  त्याचे रेटिंग सध्या ९०८ ९ इतके आहे. आयसीसी रँकिंग २ ऑक्टोबरपर्यंतच्या डेटाच्या आधारे जाहीर केली गेली आहे. त्यामुळे असे मानले जाते की त्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील सर्व नवीनतम कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही. असे असून देखील रूटने त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

हॅरी ब्रूक आणि केन विल्यमसन

ची शानदार कामगिरी

जो रूट नंतर त्याचा सहकारी हॅरी ब्रूक हा देखील८६८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडच्या या दोन फलंदाजांनंतर, न्यूझीलंडचा स्टार केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर असून त्याचे रेटिंग ८५० वर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८१६ गुणांसह चौथ्या स्थानी  आहे.

बावुमा आणि मेंडिसला जोडीला मोठा फायदा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला यावेळी क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले आहे. तो एका स्थानाने पुढे जाऊन ५ व्या स्थानावर जाऊन  पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता ७९० आहे. श्रीलंकेचा कामेंदु मेंडिसला देखील एका स्थानाचा फायदा होऊन आता ७८१ गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. अलिकडच्या सामन्यांमध्ये सातत्याने धावा काढल्याने दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात

यशस्वी जयस्वालला मोठा फटका

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन  पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७७९ वर येऊन घसरले आहे. ऋषभ पंत ७६१ गुणांसह ८ व्या स्थानावर विराजमान आहे, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ७४८ गुणांसह ९ व्या स्थानावर विराजमान असून इंग्लंडचा बेन डकेट ७४७ गुणांसह १० व्या स्थानी आहे.

 

Web Title: Latest icc test rankings announced team indias star batsman yashasvi jaiswal drops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Harry Brook
  • ICC Rankings
  • Joe Root
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

India vs South Africa LIVE Score : भारताचा डाव २०१ धावांवर गडगडला! जानसेनसमोर पंत आर्मीचे लोटांगण; द. आफ्रिकेची 288 धावांची आघाडी
1

India vs South Africa LIVE Score : भारताचा डाव २०१ धावांवर गडगडला! जानसेनसमोर पंत आर्मीचे लोटांगण; द. आफ्रिकेची 288 धावांची आघाडी

IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास  
2

IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.