Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात! विश्वचषक २०२६ मध्ये ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ मिशन; इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

5 Records Lionel Messi Can Break In FIFA 2026: स्टार फुलबॉलटपटू लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. या वर्ल्ड कपमध्ये मेस्सीकडे अनेक विक्रम मोडत इतिहास रचण्याची संधी आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 04, 2026 | 01:39 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात
  • इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी
  • चाहत्यांच्या अपेक्षा शिगेला
फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा सोहळा फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) येत्या १२ जूनपासून रंगणार आहे. यंदाचा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि विशेष ठरणार आहे. प्रथमच या स्पर्धेत तब्बल ४८ संघ सहभागी होणार असून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश मिळून १६ शहरांमध्ये या महास्पर्धेचे सह-आयोजन करणार आहेत. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांसाठी यंदाचा वर्ल्ड कप अधिक रोमांचक ठरणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi). कतार २०२२ च्या फिफा विश्वचषक स्पेर्धेत अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मेस्सी आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. ३८ वर्षीय मेस्सीसाठी हा विश्वचषक ऐतिहासिक ठरू शकतो, कारण तो आपल्या कारकिर्दीतील सहावा फिफा विश्वचषक खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे. याशिवाय मेस्सीकडे आता आणखी काही मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.

FIFA World Cup 2026: तोंड झाकलं तर खेळ संपला! 5 सेकंदांचा नियम अन्…; आता मैदानावर चालणार नाही हुज्जत; FIFA चे नवे नियम काय?

६ विश्वचषक खेळणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू?

लिओनेल मेस्सीने आपला पहिला विश्वचषक २००६ साली खेळला. त्यानंतर २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ अशा सलग पाच स्पर्धांमध्ये त्याने अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले. आता FIFA World Cup 2026 मध्ये खेळल्यास तो सहा विश्वचषक खेळणारा इतिहासातील पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरेल. विशेष म्हणजे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि मेक्सिकोचा गुइलेर्मो ओचोआ (Guillermo Ochoa) यांनाही हा विक्रम करण्याची संधी आहे.

मिरोस्लाव क्लोझेचा गोलांचा विक्रम धोक्यात

विश्वचषकाच्या इतिहासात जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोझे (Miroslav Klose) याच्या नावावर सर्वाधिक १६ गोलांचा विक्रम आहे. मेस्सीने आतापर्यंत २६ सामन्यांत १३ गोल केले आहेत. त्यामुळे आगामी स्पर्धेत त्याने आणखी चार गोल केल्यास तो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनेल. सध्या या यादीत ब्राझीलचा रोनाल्डो (Ronaldo)  (१५ गोल) आणि जर्मनीचा गेर्ड मुलर Gerd Müller (१४ गोल) यांचाही समावेश आहे. दरम्यान, फ्रान्सचा स्टार किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappé) देखील या विक्रमाच्या शर्यतीत असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.

पाच वेगवेगळ्या विश्वचषकांत गोल करण्याची संधी

मेस्सीने आतापर्यंत चार वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल केले आहेत. २०२६ च्या स्पर्धेत त्याने एक जरी गोल केला, तरी तो (Cristiano Ronaldo) ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर नंतर पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील दुसरा खेळाडू ठरेल. तसेच हा पराक्रम करणारा तो दक्षिण अमेरिकेतील पहिला फुटबॉलपटू बनेल.

असिस्टच्या बाबतीत मॅराडोनालाही मागे टाकण्याची संधी

विश्वचषक इतिहासात मेस्सीने आपल्या सहकाऱ्यांना ८ वेळा गोलसाठी असिस्ट केले आहे. या बाबतीत तो अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना Diego Maradona याच्या बरोबरीवर आहे. आगामी स्पर्धेत एक असिस्ट करताच तो अर्जेंटिनासाठी सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू बनेल. तसेच पश्चिम जर्मनीच्या फ्रिट्झ वॉल्टर (Fritz Walter) याच्या नावावर असलेल्या ९ असिस्टच्या विश्वविक्रमापासून मेस्सी फक्त दोन पावले दूर आहे.

अर्जेंटिनासाठी पुन्हा नेतृत्वाची धुरा

अर्जेंटिनाचा प्रशिक्षक लिओनेल स्कालोनीने (Lionel Scaloni) याने पुन्हा एकदा मेस्सीवर विश्वास व्यक्त केला आहे. गतविजेता अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मेस्सीच्या अनुभवामुळे संघ अधिक मजबूत मानला जात आहे. जर अर्जेंटिनाने पुन्हा विश्वविजेतेपद पटकावले, तर मेस्सी कर्णधार म्हणून दोन फिफा विश्वचषक जिंकणारा इतिहासातील पहिला फुटबॉलपटू बनेल. अर्जेंटिनाने मेस्सीच्या कर्णधारपदाखाली २०१४ आणि २०२२ चे अंतिम सामने खेळले आहेत, त्यामुळे यावेळी अंतिम सामन्यात पोहोचल्यास हा महान कर्णधारपदाचा विक्रमही निश्चित होईल.

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम

Web Title: Lionel messi targets 5 historic records fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Lionel Messi
  • Messi

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं
1

Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट
2

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट

विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…
3

विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं
4

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.