RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानावर पाऊल ठेवताच नवीन विश्वविक्रम रचला. ती आता एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. हा हरमनप्रीतचा ३६८ वा सामना होता. यापूर्वी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने ३६७ सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत ७ कसोटी, १६४ एकदिवसीय आणि १६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने मिताली राजला आधीच मागे टाकले आहे. मिताली राजने आपल्या कारकिर्दीत एकूण ३३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हरमनप्रीतने गेल्या अनेक वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करत महिला क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
हरमनप्रीत कौरने २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने १० नोव्हेंबर २००९ रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि आठ धावा केल्या. त्याच वर्षी नंतर, हरमनप्रीतने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २०१४ मध्ये कौरने कसोटी पदार्पण केले. हरमनप्रीतने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि T20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रभावी योगदान दिले आहे. विशेष म्हणजे महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. तिने भारतीय संघासाठी अनेक संस्मरणीय खेळी केल्या असून २०१७ महिला विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १७१ धावांची खेळी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
हरमनप्रीतने ७ कसोटी सामन्यात एका अर्धशतकासह २३० धावा केल्या आहेत. हरमनने १६४ एकदिवसीय सामन्यात ४,५४१ धावा केल्या आहेत. तिने या फॉरमॅटमध्ये ७ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हरमनप्रीतने १९७ सामन्यात ४,०७५ धावा केल्या आहेत.
हरमनप्रीतच्या मागोमाग सुझी बेट्स, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी आणि भारताची मिताली राज या दिग्गज खेळाडूंचा क्रमांक लागतो. तिच्या या विक्रमामुळे भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर आणखी मोठी ओळख मिळाली आहे. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?






