फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
30 Sep 2025 05:30 PM (IST)
महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
30 Sep 2025 05:28 PM (IST)
ND vs SL Live Update : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील सलामीचा सामाना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ४८ ओव्हरचा करण्यात आला आहे.
भारतीय महिला संघ : ७३/१
ओव्हर : १७.५
30 Sep 2025 05:23 PM (IST)
ST Fare Hike In Diwali: सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र दिवाळीत प्रवास करणे आता सर्वसामान्यांना अवघड जाणार आहे. कारण एसटी प्रशासनाने दिवाळीआधी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
30 Sep 2025 03:43 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता सामना थांबवण्यात आला आहे. भारताच्या संघाने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 43 धावा केल्या आहेत.
40/1 (10 ओव्हर)
30 Sep 2025 03:16 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पहिला झटका लागला आहे. भारताची महत्वाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिचा विकेट टीम इंडियाला गमवावा लागला आहे.
14/1 (3.2 ओव्हर)
30 Sep 2025 03:06 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी केले आहे.
स्मृती मानधना - 0
प्रतिका रावल - 4
04/0
30 Sep 2025 03:01 PM (IST)
भारताच्या संघाने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे, यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने रेणुका ठाकुर हिला वगळले आहे. त्याचबरोबर राधा यादव हिला संघामध्ये न घेता अमनज्योत कौर हिला संधी मिळाली आहे.
30 Sep 2025 02:44 PM (IST)
चामरी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विशमी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहारी, अचिनी कुलसुरिया, नीलाक्षी डी सिल्वा, सुगंधिका दसनायक, इनोका राणावीरा, उदेशिका प्रबोधनी
30 Sep 2025 02:40 PM (IST)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतीका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्री चरणी
30 Sep 2025 02:33 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाची कर्णधार चामरी अटापट्टू हिने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 Sep 2025 02:19 PM (IST)
2025 महिला विश्वचषक आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरू होत आहे. सर्वांच्या नजरा टीम इंडियावर आहेत आणि ते त्यांच्या पहिल्या सामन्यातून आत्मविश्वास मिळविण्याचा प्रयत्न करतील. खेळपट्टीचा अहवाल, हवामान आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
30 Sep 2025 02:10 PM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला विश्वचषकाचा सामना हा 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. हा सामना गुवाहाटीला खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग जिओहाॅटस्टारवर पाहता येणार आहे.
India W vs Sri Lanka W ODI World Cup 2025 : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाला आज सुरुवात झाली आहे. भारताचा संघ हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंकेचे कर्णधारपद हे चामरी अथापथु सांभाळणार आहे. दोन्ही संघ आज विश्वचषकाचा पहिला सामना खेळणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणारा हा विश्वचषकाचा पहिला सामना गुवाहाटीमधील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेच्या संघाने मागील काही सामन्यांमध्ये चांगले कामगिरी केली आहेत त्यामुळे ते टीम इंडियासाठी नक्कीच आव्हान उभे करू शकतात.