Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न

Lovlina Borgohain India Map Restaurant Controversy: २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांदरम्यान, भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटने वापरलेल्या भारताच्या चुकीच्या नकाशावर आक्षेप घेतला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्या रेस्टॉरंटने सार्वजनिक माफी मागितली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 02:41 PM
भारताचा अपूर्ण नकाशा दाखवणे पडले महागात; लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न
Follow Us
Follow Us:
  • ग्लासगोत भारताच्या चुकीच्या नकाश्यावरून वाद
  • लव्हलिनाच्या आक्षेपानंतर ग्लासगोतील रेस्टॉरंटचा यू-टर्न
  • नेमकं प्रकरण काय?
ग्लासगो राष्ट्रकुल खेळांदरम्यान, एकीकडे भारत पदक जिंकल्याचा सेलिब्रेशन करत होता तर, दुसरीकडे ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमधील एका चुकीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला. भारतीय बॉक्सिंग पथकाचे यजमानपद भूषवणाऱ्या ग्लासगो येथील ‘मिस्टर सिंग्स इंडिया: द होम ऑफ करी’ या भारतीय रेस्टॉरंटच्या नॅपकिन आणि लोगोवर भारताचा अपूर्ण नकाशा दाखवण्यात आला. यावर भारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर, रेस्टॉरंटने यावर माफी मागितली आहे.

ग्लासगो Commonwealth Games 2026 मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; ‘या’ स्थानावर केला मोहीमेचा शानदार शेवट

रेस्टॉरंटने मागितली माफी आणि इंस्टाग्राम अकाउंट देखील हटवले

वाद वाढल्यानंतर, रेस्टॉरंटने एक अधिकृत निवेदन जारी करून बिनशर्त माफी मागितली. व्यवस्थापनाने म्हटले, ‘आम्हाला आमच्या भारतीय वंशाचा आणि वारशाचा अभिमान आहे. सर्वप्रथम, भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल आम्ही बिनशर्त माफी मागतो. हे त्वरित दुरुस्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही आमच्या लोगोच्या जागी योग्य नकाशा लावू. भारतीय संघाचे यजमानपद भूषवणे हा आमच्यासाठी सन्मान होता. खेळाडू आणि पाहुण्यांनी संध्याकाळचा पुरेपूर आनंद घेतला आणि या आठवणी आमच्यासोबत कायम राहतील.’

माफी मागितल्यानंतर लगेचच, रेस्टॉरंटचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट देखील हटवण्यात आले. हे अकाउंट कायमचे हटवण्यात आले की तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.

You’d expect an Indian restaurant to know what India looks like. Apparently not. Even worse, they’ve printed the incorrect version on their hand towels too 🤦‍♀️ Awkward moment after India’s Commonwealth Games success…At a celebratory dinner in Glasgow, boxer Lovlina Borgohain… pic.twitter.com/MhkKvN9jpI — Nabila Jamal (@nabilajamal_) August 2, 2026

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह एकूण १० पदके जिंकली. या ऐतिहासिक यशानंतर, संपूर्ण संघ आनंद साजरा करण्यासाठी ग्लासगोमधील ‘मिस्टर सिंग इंडिया, द होम ऑफ करी’ या प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेला होतालव्हलिनाच्या लक्षात आले की एका नॅपकिनवर भारताचा नकाशा छापलेला आहे, ज्यामध्ये ईशान्य भारताचे काही भाग दाखवलेले नव्हते. त्यानंतर तिने शांतपणे आणि आदराने आपली चिंता रेस्टॉरंट व्यवस्थापनासमोर मांडली.

लव्हलिना म्हणाली की, ‘कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नका. भारताच्या नकाशात आपला ईशान्य भारताचा समावेश नाही हे पाहून मला दुःख झाले आहे. बाहेर लावलेल्या नकाशातही तीच चूक आहे. मी ईशान्य भारतातील आहे आणि यामुळे आम्हाला खूप वेदना होतात. कृपया पुढच्या वेळी याची काळजी घ्या. धन्यवाद.’ हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होताच अनेक लोकांनी रेस्टॉरंटवर टीका केली आणि योग्य नकाशा वापरण्याची मागणी केली.

लव्हलिनाच्या पाठोपाठ, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (BFI) अध्यक्ष अजय सिंग यांनीही रेस्टॉरंटने वापरलेल्या नकाशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, नॅपकिनवर केवळ ईशान्यच नव्हे, तर जम्मू आणि काश्मीरही अपूर्णपणे दर्शवले आहे. त्यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाला आवाहन केले की, ‘केवळ ईशान्यच नाही, तर काश्मीरचाही त्यात समावेश नाही. चुकीचे नकाशे असलेले सर्व नॅपकिन तात्काळ काढून टाकावेत आणि त्याऐवजी भारताची संपूर्ण भौगोलिक सीमा अचूकपणे दर्शवणारा नकाशा लावावा.’

Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral

Web Title: Lovlina borgohain india map controversy glasgow restaurant apologised insta account removed amid cwg 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games 2026
  • India news
  • Lovlina Borgohain
  • map

संबंधित बातम्या

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
1

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
2

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
3

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
4

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.