Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs CSK : ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK च्या ताफ्यात ‘या’ मुंबईकराची एंट्री, रणजी ट्रॉफीत लावला होता धावांचा रतीब.. 

आयपीएल २०२५ चा १८  हंगामात सिएसकेची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. संघाचा नियमित कर्णधार रूतूराज गायकवाड दुखपतीने आयपीएलमधून बाहेर पडल्याने त्याच्या जागी आयुष म्हात्रे या फलंदाजाला संघात सामील करण्यात येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 14, 2025 | 10:35 AM
LSG vs CSK: 'This' Mumbaikar enters CSK squad in place of Rituraj Gaikwad, had a run-scoring streak in Ranji Trophy..

LSG vs CSK: 'This' Mumbaikar enters CSK squad in place of Rituraj Gaikwad, had a run-scoring streak in Ranji Trophy..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८  हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरवात चांगली झाली होती. त्यांनी मुंबई इन्डियनसला पराभूत करत आयपीएल २०२५  मध्ये झोकात सुरवात केली होती. मात्र त्यांतर चेन्नईच्या संघाचा आलेख घसरतच गेला. त्यांनी सलग ५  सामने गमावले आहेत.  त्यातच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला आहे. आता एक बातमी समोर आली आहे की, चेन्नई संघ ऋतुराजच्या जागी मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाचा समावेश करणार आहे.

सीएसके संघ व्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयुष म्हात्रे हा फलंदाज काही दिवसांत चेन्नई सुपर किंग्ज संघात  सामील होणार आहे.  शनिवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकबझच्या मते, आयुषला ताबडतोब चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. पण तो दोन दिवसांनी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. मेगा लिलावात म्हात्रे यांना कोणत्याही संघाकडून खरेदी करण्यात आले नव्हते. आता तो ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर या संघात सामील होणार आहे.

हेही वाचा : SRH Vs PBKS : ‘आम्ही उत्तम धावसंख्या उभारली..’, हैद्राबादच्या वादळाचा तडाखा बसलेल्या पंजाबच्या अय्यरची प्रतिक्रिया..

काही दिवसांपूर्वीच झाली चाचणी..

चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अलिकडेच आयुष म्हात्रेला चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. म्हात्रे यांच्याव्यतिरिक्त, गुजरातमधील उर्विल पटेल आणि उत्तर प्रदेशमधील सलमान निजार यांना देखील  बोलावण्यात आले होते. पण आयुष म्हात्रेने व्यवस्थापनाला प्रभावित करण्यात यश मिळवले आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर पृथ्वी शॉचे नाव देखील चर्चेत होते. पण, चेन्नई सुपर किंग्जने शॉमध्ये रस न दाखवता  व्यवस्थापनाकडून आयुष म्हात्रेचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रे रणजी करंडकाच्या या हंगामात  मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे . म्हात्रेने ८ सामन्यांमध्ये २ शतकांच्या मदतीने ४७१ धावा केल्या आहेत. याशिवाय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावून म्हात्रे याने सामना जिंकून दिला होता.  विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये म्हात्रेने ६४.४२ च्या सरासरीने ४५८ धावा चोपल्या होत्या.

हेही वाचा : SRH Vs PBKS : ‘युवराज, सूर्याने मला प्रोत्साहन दिले…’, पंजाबला पाणी पाजणाऱ्या शतकवीर अभिषेक शर्माने सांगितले खेळीचे रहस्य..

दुखापतीमुळे ऋतुराज आयपीएल २०२५ बाहेर

गुरुवारी (१० एप्रिल) कोपराच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सीएसकेकडून खेळत असताना त्याला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत, एमएस धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जची धुरा आली आहे.

Web Title: Lsg vs csk mumbaikar ayush mhatre joins csk squad in place of rituraj gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG vs CSK
  • MS Dhoni Captain
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
2

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 
3

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 

Irfan Pathan on Ms Dhoni: धोनीवर टीका? 5 वर्षांनंतर इरफान पठाणने ‘त्या’ व्हिडिओवर अखेर मौन सोडले
4

Irfan Pathan on Ms Dhoni: धोनीवर टीका? 5 वर्षांनंतर इरफान पठाणने ‘त्या’ व्हिडिओवर अखेर मौन सोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.