Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs PBKS :  Sanjiv Goenka यांचे २७ कोटी पाण्यात..! Rishabh Pant पुन्हा सुपरफ्लॉप, चाहत्यांकडून होतोय ट्रोल.. 

आयपीएल २०२५ चा ५४ वा सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जने पराभूत केले आहे. या सामन्यात एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत सुपर फ्लॉप ठरला आहे. त्यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 05, 2025 | 10:38 AM
LSG vs PBKS: Sanjiv Goenka's 27 crores in the water..! Rishabh Pant is a superflop again, getting trolled by fans..

LSG vs PBKS: Sanjiv Goenka's 27 crores in the water..! Rishabh Pant is a superflop again, getting trolled by fans..

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs PBKS : आयपीएल २०२५ चा ५४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला.  या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने  प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौला २३६ धावांचे भले मोठे लक्ष्य दिले होते. प्रभसिमरन सिंगने आपल्या ९१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी केली. प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावाचा करू शकला. एलएसजीकडून आयुष बडोनी (४० चेंडू ७४धावा) आणि अब्दुल समद (२४ चेंडूत ४५धावा) यांची झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. तर संघाचा कर्णधार ऋषभ पंत या सामन्यात देखील फ्लॉप ठरला. त्याने फक्त १७ चेंडूत १८ धावा केल्या.

हेही वाचा : IND Vs END : ‘इंग्लंड दौऱ्यात कुलदीप यादवची भूमिका महत्त्वाची..’ माजी भारतीय निवडकर्त्यांसह प्रशिक्षकांचे मत..

पंजाबने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना लखनौ संघाच्या सलामीवीर फलंदाजांनी खूप निराशाजनक कामगिरी केली. मिचेल मार्श, एडेन मार्करन आणि निलोकस पूरन सारखे फलंदाज या वेळी फार काही खास करू शकले नाही.  त्याच वेळी, कर्णधार ऋषभ पंतची बॅट देखील नेहमीप्रमाणे या सामन्यातही शांत दिसून आली. आयपीएल २०२५ मध्ये ऋषभ पंतची फलंदाजी खूपच निराशाजनक राहिली आहे. पंजाबविरुद्ध पंत १७ चेंडूत फक्त १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी एलएसजीच्या कर्णधारावर चांगलाच राग व्यक्त केला.

पंतला सोशल मीडियावर ट्रोल

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत या वर्षीच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात समाविष्ट केले. असे असून देखील, आयपीएल २०२५ हा पंतसाठी सर्वात वाईट हंगाम ठरत आहे. त्याने या हंगामात एकूण ११ सामने खेळले असून यामध्ये त्याच्या बॅटमधून फक्त १२८ धावाच आल्या आहेत. अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियावर पंतला खूप ट्रोल करताना दिसून येत आहे.

हेही वाचा : RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, फोटो व्हायरल..

तसेच लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर एडेन मार्कराम आणि मिशेल मार्श हे देखील पंजाबविरुद्ध सुपर फ्लॉप ठरले. एडेन मार्करम १३ धावांवर तर मिचेल मार्श शून्य धावांवर बाद झाला. यानंतर लगेचच निकोलस पूरन देखील ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने तिन्ही फलंदाजांना माघारी पाठवले. याशिवाय डेव्हिड मिलरही अवघ्या ११ धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेला.

Web Title: Lsg vs pbks sanjiv goenka loses 27 crores rishabh pant is a superflop again trolled by fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG vs PBKS
  • Rishabh Pant
  • Sanjiv Goenka

संबंधित बातम्या

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 
1

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
4

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.