RR vs KKR: Riyan Parag fails to score a century on the field, tears in mother's eyes in the stadium, photo goes viral..
RR vs KKR : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला. कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत आंद्रे रसेलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर २०६ धावांचे लक्ष्य उभे केले. कोलकाताने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान संघ मैदानात उतरला आणि त्यांना केवळ २०५ धावा करता आल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात राजस्थानला कोलकाताकडून १ धावेने पराभव स्वीकारावा लगाला.
राजस्थान रॉयल्सने जरी हा सामना गमावला असला तरी, केकेआरविरुद्धच्या शानदार खेळीनंतर कर्णधार रियान परागने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे. खरंतर, रियान परागने केकेआरविरुद्ध ९५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ षटकार लगावले आहे. तसेच त्याने एक विशेष कामगिरी देखील केली आहे. परागने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आणि इतिहास रचला आहे. प्रथम, त्याने मोईन अलीच्या पाच चेंडूंवर लागोपाठ पाच षटकार लगावले आहे. यानंतर, त्याने वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या चेंडूवर देखील षटकार मारला.
रियान परागने ४५ चेंडूत ९५ धावांची स्फोटक खेळी केली. असे असून देखील, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याला हर्षित राणाने ९५ धावांवर माघारी पाठवले. रियान पराग बाद होताच त्याच्या आईच्या हृदयाचा ठोका चुकला. आधी जेव्हा रायन षटकार मारत होता तेव्हा त्याची आई खूप आनंदी असल्याचे दिसून आले. पण, त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आता त्यांच्या मुलाला माघारी पाठवल्यानंतर त्यांची दुःखद प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. रियान परागने ९५ धावांच्या खेळीदरम्यान ८ षटकार आणि ६ चौकार मारले आहेत.
हेही वाचा : CSK vs RCB : किंग कोहली आणि नवख्या आयुषने एकाच वेळी मोडले अनेक विक्रम! ‘असे’ करणारा विराट पहिलाच फलंदाज..
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना अटीतटीचा खूपच रोमांचक झाला. शेवटच्या षटकात आरआरला जिंकण्यासाठी २२ धावांची गरज होती. दरम्यान, शुभम दुबेने काही फटके देखील लगावले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर राजस्थानला जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता असताना वैभव अरोराच्या या चेंडूवर शुभमला मोठा फटका मारता आला नाही. परिणामी कोलकाताने सामना १ धावेने जिंकला.