फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Mumbai Indians match report: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये नुकताच सामना पार पडला या सामन्याचे आयोजन लखनऊमधील इकाना स्टेडियमवर करण्यात आले होते. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले आहे आणि या सीझनचा दुसरा विजय नावावर केला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला या सीझनचा तिसरा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामनामध्ये लखनऊचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने संघाला दमदार सुरुवात करून दिली होती.
मिचेल मार्शने संघासाठी ३१ चेंडूमध्ये ६० धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ९ चौकार मारले. इडन मार्करमचा खराब फॉर्म सुरु होता या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूमध्ये ५३ धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर लखनऊ साठी बडोनीने १९ चेंडूमध्ये ३० धावांची खेळी खेळली.तर डेव्हिड मिलरने संघासाठी १४ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर कॅप्टन हार्दिक पांड्याने एकट्याने संघासाठी पाच विकेट ची कमाई केली. हार्दिकने ऋषभ पंत, डेविड मिलर, आकाशदीप, निकोलस पुरण आणि इडन मार्करमला बाहेरचा रस्ता दाखवला. तर ट्रेंट बोल्टने संघासाठी एक विकेट घेतला, तर मुंबईचे युवा गोलंदाज विघ्नेश पुथुर आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावले होते. विल जॅक्सन संघांसाठी फक्त ५ धावा केल्या. तर रायन रिकलटन याने मागील सामन्यात कमालीची फलंदाजी केली होती पण तो या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही. त्याने या सामन्यात ५ चेंडूमध्ये १० धावा केल्या. नमन धीर याने संघासाठी २४ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने संघासाठी ४३ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ९ चौकार मारले. पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही.
मुंबई इंडियन्सच्या संघाने या सामन्यात धक्कादायक निर्णय घेतला आणि तिलक वर्माला रिटायर आऊट घोषित करण्यात आले. तिलक वर्माने संघासाठी २३ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या आणि त्याला मैदानाबाहेर बोलावले. कर्णधार हार्दिक पांड्य फलंदाजीसाठी आला होता त्याने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या पण तो विजयापर्यत नेऊ शकला नाही.