Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: महाराष्ट्राच्या वाघिणीने चीनला उभा फाडला! प्रिथिकाने तिरंदाजीत पटकावले ‘सुवर्ण’

Asian Games 2026: भारतीय महिला कंपाऊंड तीरंदाजी संघातून खेळताना प्रिथिकाने आपल्या अचूक निशाणा साधत देशाला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. या दैदिप्यमान यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 02:29 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • प्रिथिका प्रदीपने जिंकले गोल्ड मेडल
  • तीरंदाजी स्पर्धेत केली शानदार कमाल 
  • प्रिथिकाने देशासह महाराष्ट्राची उंचवली मान 
Asian Games 2026: सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. अनेक क्रीडा प्रकारांत भारताने पदके जिंकली आहेत. दरम्यान प्रिथिका प्रदीपने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रिथिका प्रदीप हिने तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

भारतीय महिला कंपाऊंड तीरंदाजी संघातून खेळताना प्रिथिकाने आपल्या अचूक निशाणा साधत देशाला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. या दैदिप्यमान यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील महिला कंपाऊंड तीरंदाजीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले.

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

🥇एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध! पिंपरी-चिंचवडची कन्या प्रिथिका प्रदीप हिने एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघासोबत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता… pic.twitter.com/hjzK7rZUEO — Hemant Rasane (@HemantNRasane) October 1, 2026

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाने बलाढ्य चीनच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. प्रिथिका प्रदीप हिने मोक्याच्या क्षणी मारलेले अचूक वेध या विजयात निर्णायक ठरले. अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने गोल्ड मेडल जिंकले आहे.  प्रिथिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये, तसेच तिच्या निवासस्थानी आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या कुटुंबियांवर आणि प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिक आणि विविध क्रीडा संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटून या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

प्रिथिका प्रदीपने गेल्या अनेक वर्षांपासून तीरंदाजी क्षेत्रात सातत्याने कठोर परिश्रम घेतले आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याची छाप पाडली होती. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावल्याने तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि नागरिकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Web Title: Maharashtra pcmc prithika pradeep wins gold medal at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • PCMC News

संबंधित बातम्या

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
1

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
2

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई
3

Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड
4

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.