Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकात कांस्यपदक, तरी Manu Bhaker का झाली निराश? स्वतःच केला मोठा खुलासा

Manu Bhaker Reaction On Winning Bronze Medal: हांगझू विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकूनही, मनू भाकर ही आपल्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नसल्याचे म्हटले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 02:21 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ब्राँझ जिंकूनही मनू भाकरची स्वतःवर नाराजी
  • काय म्हणाली भारताची स्टार नेमबाज?
  • वैयक्तिक सुवर्णपदक अजूनही प्रतीक्षेत
भारतीय स्टार नेमबाज आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती, मनू भाकरने नुकत्याच हांगझू येथे झालेल्या आयएसएसएफ (ISSF)  नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तर , ईशा सिंगने सुवर्णपदक जिंकले. मात्र, हे पदक जिंकल्यानंतरही मनू भाकरने नाराजी व्यक्त केली आहे. कास्यंपदक जिंकूनही मनाल संमिश्र भावना असल्याचे तिने म्हटले आहे. मनूने यापूर्वी म्युनिक विश्वचषक स्पर्धेत सम्राट राणासोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?

मी याहून चांगली कामगिरी करू शकले असते…

विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर, मनू भाकरने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली की, ‘आणखी एक कांस्य पदक. या पदकाबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या कामगिरीत सुधारणा करू शकले याचा मला आनंद आहे, पण मला हेही माहित आहे की मी याहून अधिक चांगली कामगिरी करू शकले असते. मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे. माझ्या कामगिरीमद्ये अजूनही सुधारणा करत राहिन  आणि हीच गोष्ट मला प्रेरणा देते. मला एका वेळी एक पाऊल टाकत पुढे जायचे आहे.’ मनूसाठी पदक जिंकणे हे अंतिम ध्येय नाही, याउलट ती आपली कामगिरी आणि चांगली करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.

Another bronze. 🥉 I have mixed feelings about this one. I’m happy that I was able to improve my performance, but at the same time, I know I could have done better.
What makes me happy is seeing that the hard work is showing. There’s still plenty of room for improvement, and… pic.twitter.com/Y08HuATF8j
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) July 28, 2026

वैयक्तिक सुवर्णपदक अजूनही प्रतीक्षेत

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत २१ वर्षीय ईशाने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत ४० गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले, तर पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकलेल्या मनूने शूट-ऑफ जिंकून कांस्यपदक पटकावले. २०२६ मध्ये मनू भाकर आपल्या पहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकाच्या शोधात आहे. यापूर्वी, तिने सम्राट राणासोबत म्युनिक विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. तसेच, या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्णपदके जिंकली, पण ती दोन्ही सांघिक प्रकारात होती.

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय

Web Title: Manu bhaker bronze medal reaction mixed feeling on winning issf world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Manu Bhaker
  • Shooting World Cup

संबंधित बातम्या

घरात घुसून चीनला केले पराभूत! ISSF World Cup मध्ये ईशा सिंगचा ‘सुवर्ण’वेध, मनू भाकरला कांस्य
1

घरात घुसून चीनला केले पराभूत! ISSF World Cup मध्ये ईशा सिंगचा ‘सुवर्ण’वेध, मनू भाकरला कांस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.