CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय
१ जून १९९८ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुलवीर सिंगच्या गावात खेळांबद्दल फारशी चर्चा नव्हती. तिथल्या तरुणांचे सर्वात मोठे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे होते. गुलवीर त्या तरुणांपैकीच एक होता. त्याला राष्ट्रकुल खेळ किंवा आशियाई खेळांबद्दल फारशी माहिती नव्हती. त्याच्यासाठी धावणे हे पदक जिंकण्याचा मार्ग नसून, सैन्यात नोकरी मिळवण्याचा एक मार्ग होता. तो क्रीडा कोट्यातून भारतीय सैन्यात दाखल झाला आणि ग्रेनेडियर्स रेजिमेंटचा भाग बनला. हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या राष्ट्रीय शिबिरात त्याला जाणवले की, धावणे हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून देशासाठी इतिहास घडवण्याची एक संधी आहे.
भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतरही गुलवीर सिंगने धावणे सुरू ठेवले आणि त्याला २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळाली, जिथे त्याने कांस्य पदक जिंकले. त्याने २०२३ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले, जिथे त्याने ५,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले.
गुलवीर सिंगचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या २७ वर्षीय खेळाडूने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी धावायला सुरुवात केली आणि याच आधारावर त्याला सैन्यात नोकरी मिळवण्यात यश आले. गुलवीर सिंग हा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील सिरसा गावचा रहिवासी असून, २०१८ मध्ये भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये सामील झाल्यानंतर त्याने धावणे सुरूच ठेवले, ज्यामुळे त्याचा ॲथलेटिक्समध्ये सहभाग वाढला आणि तो आपल्या प्रतिभेने संपूर्ण देशाला गौरव मिळवून देत आहे. गुलवीरने अंतिम रेषा ओलांडली, तेव्हा घड्याळ २७ मिनिटे ४९.७८ सेकंदांवर थांबले. ही केवळ एक वेळ नव्हती, तर अनेक वर्षांच्या संघर्षाचे, शिस्तीचे आणि स्वप्नांचे फळ होते. रौप्य पदक जिंकून गुलवीरने इतिहास रचला.
Gulveer Singh creates history, becoming the first Indian to win a Commonwealth Games medal in the Men’s 10,000m with a brilliant silver medal finish. 👏 Watch the Commonwealth Games Glasgow 2026 LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork… pic.twitter.com/6VIXZysfBJ — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 28, 2026
भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या गुलवीर सिंग यांच्या नावावर १०,००० मीटर, ५,००० मीटर, हाफ मॅरेथॉन आणि एक मैल धावण्याच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम आहेत. २०२६ मध्ये, गुलवीरने हाफ मॅरेथॉन केवळ ५९ मिनिटे आणि ४२ सेकंदात पूर्ण करून, एका तासापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला. यापूर्वी, गुलवीर सिंगने २०२५ मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५,००० आणि १०,००० मीटर स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. मे २०२६ मध्ये, अमेरिकेतील म्युझिक सिटी कार्निव्हलमध्ये चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत एक मैल धावणारे गुलवीर सिंग हे पहिले भारतीय ठरले.
वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक






