Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCL 2025 : युनिव्हर्स बॉसचा विक्रम खालसा! टी-२० सामन्यात षटकारांचा आता ‘हा’ आहे नवीन ‘किंग’; पहा Video 

जर लीग क्रिकेट २०२५ चा पहिला सामना आज १३ जून रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा १२३ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात फिन अॅलनचे वादळ घोंघावले होते.  त्याने या सामन्यात इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 13, 2025 | 07:42 PM
MCL 2025: Universe Boss's record is broken! This is the new 'king' of sixes in T20 matches; Watch Video

MCL 2025: Universe Boss's record is broken! This is the new 'king' of sixes in T20 matches; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

MCL 2025 : मेजर लीग क्रिकेट २०२५ चा पहिला सामना आज १३ जून रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात ओकलंड कोलिझियम येथे खेळवण्यात आला होता. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने वॉशिंग्टन फ्रीडमला १२३ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात  न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर फिन अॅलनचे वादळ घोंघावले होते.  त्याने या सामन्यात स्फोटक फलंदाजी करून इतिहास रचला आहे. त्याने  ५१ चेंडूचा सामना करत १५१ धावांची वादळी खेळी खेळली.

फिन अॅलनने  टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. फिन अॅलने टी-२० सामन्यात  सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर क्रिस गेल आणि एस्टोनियाचा साहिल चौहान यांच्या नावावर हा विक्रम संयुक्तपणे नोंदवण्यात आला होता. या दोन्ही फलंदाजांनी टी-२० सामन्यात अनुक्रमे १८-१८ षटकार ठोकले आहेत. परंतु आज झालेल्या सामन्यात अॅलनने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध १९ षटकार मारून विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा : WTC Final: भविष्यातील सर्वात मोठा अष्टपैलू खेळाडू माहिती आहे का? रिकी पॉन्टिंगने लावला ‘या’ खेळाडूवर डाव..

फिन अॅलन टी-२० मध्ये सर्वात जलद १५० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.  सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना त्याने आज फक्त ४९ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठलाया आहे. या खेळीत त्याने ५१ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने  २९६.०८ च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने १९ षटकार आणि ५ चौकार  लगावले आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर  फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने विजय मिळवला.

FINN ALLEN SMASHED 151* (51) WITH 19 SIXES IN THE MLC. 🥶 – The most sixes in a T20 innings. pic.twitter.com/7EOnaxkaw9 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025

हेही वाचा :   SA vs AUS : WTC Final सामन्यात Ahmedabad plane crash मधील मृतांना वाहिली श्रद्धांजली; खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या..

सामन्याची स्थिती : 

वॉशिंग्टन फ्रीडमने ओकलंड कोलिझियम येथे टॉस जिंकला आणि सॅन फ्रान्सिस्कोला प्रथम फलंदाजीसाठी आंतरीत केले होते.  प्रथम फलंदाजी केल्यानंतर, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या संघाने २० षटकांत पाच गडी गमावून २६९ धावांचा डोंगर उभा केला होता. फिन अॅलनने संघाकडून सर्वाधिक १५१ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय हसन खानने १८ चेंडूत नाबाद ३८ धावा, संजय कृष्णमूर्तीने २० चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले.   २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमचा संपूर्ण संघ १३.१ षटकात केवळ १४६ धावाच करू शकला.

 

Web Title: Mcl 2025 universe bosss record broken finn allen becomes the new king for hitting the most sixes in a t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 07:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.