डब्ल्यूटीसी फिनल अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनल सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना ११ जूनपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. दुसरीकडे, १२ जून रोजी भारतात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघात घडला असून विमानातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर जगातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच क्रीडा जगतातून देखील या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघांनी या घटनेवर मैदानातील आपल्या कृतीने भावना व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाने अहमदाबाद विमान अपघात प्रकरणावर संपूर्ण जगासमोर शोक व्यक्त केला आहे. या दोन्ही संघातील सर्व खेळाडूं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात काळ्या पट्ट्या घालून मैदानावर उतरले आहेत. या सामन्यात केवळ खेळाडूच नाही तर पंच देखील काळ्या पट्ट्या घालून मैदानावर उतरलेले दिसून आले आहेत, तसेच त्यांनी या कृतीतून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Australian and South African players wearing black armbands and observed a moment of silence for Ahmedabad plane victims. pic.twitter.com/DEelygZsr8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाच्या या निर्णयाचे जगभरातून, विशेषतः भारतात कौतुक होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील दुसऱ्या विजयावर आहे, यापूर्वी, २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवून जेतेपदावर नाव कोरले होते.
दक्षिण आफ्रिकेबद्दल सांगायचे झाल्यास, हा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसराच अंतिम सामना आहे. २०२१ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला हरवून पहिले जेतेपद पटकावले होते.
हेही वाचा : SA vs AUS : WTC Final ठरणार अखेरची कसोटी? ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन दिग्गज घेणार मोठा निर्णय..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने उभे आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडे ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यापुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर २०७ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाकडे आता २८१ धावांची आघाडी आहे. साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर २८२ धावा करण्याची गरज होती, त्यातील साऊथ आफ्रिकेच्या दुसऱ्या दवाला सुरवात झाली आहे. साऊथ आफ्रिकेने १ विकेट गमावून ४१ धावा केल्या आहेत. एडेन मार्कराम आणि वियान मुल्डर ही खेळत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाल दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्यासाठी ९ विकेट्सची गरज आहे.