रिकी पोंटिंग(फोटो-सोशल मिडिया)
SA vs AUS : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनल सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आता २८१ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात साऊथ आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरवात झाली आहे. साऊथ आफ्रिकेने १ विकेट गमावून ६९ धावा केल्या आहेत. एडेन मार्कराम आणि वियान मुल्डर ही खेळत आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाल दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना जिंकण्यासाठी ९ विकेट्सची गरज आहे तर आता साऊथ आफ्रिकेला २१३ धावांची गरज आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पॉन्टिंगने एक मोठा दावा केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनचे खूप कौतुक केले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात मार्को जॅन्सनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगलेच जेरीस आणले आहे. कांगारू संघाला २१२ धावांवर गुंडाळण्यात त्याने महत्त्वाची भूमिका वठवली आहे. या सामन्यात जान्सेनच्या खात्यात एकूण ३ विकेट्स जमा आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू रिकी पॉन्टिंगने साऊथ आफ्रिकेच्या मार्को जान्सेनला भविष्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधले आहे.
रिकी पॉन्टिंगने आयसीसीला दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “कोणत्या देखील परिस्थितीचा त्याच्यावर (मार्को जॅनसेन) फारसा परिणाम होत नाही. त्याचा दिवस चांगला असो वा वाईट, जॅनसेन नेहमीच एक सारखाच दिसतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करतेवेळी जॅनसेनला बोटाला दुखापत झाली होती, तरी देखील तो जलद गोलंदाजीकडे परतला आणि मार्श लाबुशेनची महत्त्वाची विकेट त्याने काढली. यावरून हे स्पष्ट होते की दुखापत असूनही, जॅनसेनने हार पत्करली नाही आणि या सामन्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले. ” असे रिकी पॉन्टिंगने म्हटले आहे.
हेही वाचा : SA vs AUS : WTC Final ठरणार अखेरची कसोटी? ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन दिग्गज घेणार मोठा निर्णय..
पॉन्टिंग पुढे म्हणाला की, “जॅनसन मानसिकदृष्ट्या खूप मजबूत खेळाडू असून तो मैदानावर येताना सतत त्याचे शंभर टक्के देण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो अजूनही खूप तरुण खेळाडू आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात मार्को कसोटी स्वरूपातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणार आहे.”