Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठरला पहिलाच खेळाडू..   

आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने एक विशेष कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 28, 2025 | 11:13 AM
MI vs LSG: Jaspreet Bumrah's great performance, he did a great job for Mumbai Indians in IPL, he became the first player to do so.

MI vs LSG: Jaspreet Bumrah's great performance, he did a great job for Mumbai Indians in IPL, he became the first player to do so.

Follow Us
Close
Follow Us:

MI vs LSG : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईने एलएसजीचा पराभव केला आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ  १६१ धावाच करू शकला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४ बळी घेत संघाचे कंबरडे मोडून काढले होते. या सामन्यात त्याने मुंबईसाठी एक विशेष कामगिरी केली आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.

वेगवान गोलंदाज जजसप्रीत बुमराहने लखनौविरुद्ध ४ बळी घेत ही कामगिरी करून दाखवली आहे. एडेन मार्करामला बाद  करताच  बुमराहने आपला १७१ वा बळी पूर्ण केला आणि यासह त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडून काढला. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी १७० बळी टिपले आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळाताना आयपीएलमध्ये त्याच्या दशकभराच्या कारकिर्दीत, मलिंगाने १२२ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने  १७० फलंदाजांना बाद केले आहे. त्याच वेळी, स्टार गोलंदाज बुमराहने आता १३९ सामन्यांमध्ये १७४ बळी घेत मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आहे. बूमराह मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

हेही वाचा : Women’s Tri-Series : श्रीलंकेवर भारताच्या पोरी पडल्या भारी, टीम इंडियाची लंकेचा पराभव करत Tri-Series मध्ये विजयी सुरवात..

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  1. जसप्रीत बुमराह – १७४*
  2. लसिथ मलिंगा – १७०
  3. हरभजन सिंग – १२७
  4. मिशेल मॅकक्लेनघन – ७१
  5. किरोन पोलार्ड – ६९
  6. हार्दिक पंड्या – ६५
  7. कृणाल पंड्या – ५१
  8. ट्रेंट बोल्ट – ४८
  9. राहुल चहर – ४१
  10. मुनाफ पटेल – ४०

हेही वाचा : GT vs RR : आज कुणाची बॅट तळपणार? कोण काढेल पंजा? Rajasthan Royals समोर गुजरात टायटन्सचे आव्हान..

आयपीएलमध्ये एखाद्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सुनील नरेनच्या नावावर नोंदवला आहे. २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताहे. त्याने कोलकात्यासाठी १८५ सामने खेळले आहेत आणि १८७ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

आयपीएलमध्ये संघासाठी सर्वाधिक विकेट्स

  1. सुनील नारायण (केकेआर) – १८७
  2. जसप्रीत बुमराह (एमआय) – १७४*
  3. लसिथ मलिंगा (एमआय) – १७०
  4. भुवनेश्वर कुमार (एसएलआरएच) – १५७
  5. ड्वेन ब्राव्हो (सीएसके) – १४०
  6. रवींद्र जडेजा (सीएसके) – १३९
  7. युजवेंद्र चहल (आरसीबी) – १३९
  8. हरभजन सिंग (एमआय) – १२७
  9. आंद्रे रसेल (केकेआर) – १२१
  10. अमित मिश्रा (डीसी) – १०६

जसप्रीत बुमराने ४ एप्रिल २०१३ मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यान आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चार षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने विराट कोहलीची विकेट घेऊन लीगमध्ये पदार्पण केले  होते. आयपीएलमध्ये दोनदा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर जमा आहे, जो कोणत्याही गोलंदाजासाठी संयुक्तपणे सर्वोच्च आहे.

Web Title: Mi vs lsg jaspreet bumrahs great performance for mumbai indians in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Jaspreet Bumrah
  • MI vs LSG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 
1

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
2

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर 
4

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.