फोटो सौजन्य - Mumbai Indians
सूर्यकुमार यादवने नावावर केला नवा रेकॉर्ड : मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने संघासाठी कमालीचा खेळ या सीझनमध्ये खेळाला आहे. या सीझनमध्ये त्याने सर्व सामन्यात २५ हुन अधिक धावा करण्यात यशस्वी झाला आहे. आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ७ विकेट गमावून २१५ धावा केल्या. यामध्ये वानखेडेच्या मैदानावर मुंबईच्या फलंदाजांची वर्चस्व पाहायला मिळाले. आता मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण करण्याचा मोठा विक्रम केला आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली.
सूर्यकुमार यादव हा त्यांच्या खास आगळ्यावेगळ्या शॉटसाठी ओळखला जातो त्याने भारतीय संघासाठी देखील कमालीची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने T२० क्रिकेट सोडल्यानंतर संघाने सूर्यकुमार यादव भारतीय T२० संघाचे नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला खास क्षण मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १४ व्या षटकात आला, जेव्हा तिलक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्यासोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. आवेश खान ऑफ स्टंपच्या बाहेर एक वाईड बॉल टाकतो, जो सूर्यकुमारने उत्कृष्टपणे चौकार मारत स्क्वेअरवरून स्वीप केला. या चौकारासह, सूर्यकुमारने आयपीएलमध्ये आपले ४००० धावा पूर्ण केल्या आणि असे करणारा तो १७ वा फलंदाज बनला.
His 𝘴𝘮𝘢𝘤𝘬𝘪𝘯𝘨 form continues 👌
The ever-reliable Surya Kumar Yadav departs after his 3️⃣rd FIFTY of the season🫡
With this, he also leads the Orange Cap leaderboard 🧢
Updates ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG | @mipaltan | @surya_14kumar pic.twitter.com/OSCIKvxIbO
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, ज्याने आतापर्यंत ८३९६ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर रोहित शर्मा येतो. याशिवाय शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एमएस धोनी, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स सारखी मोठी नावे देखील या यादीत समाविष्ट आहेत. कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या आहेत यावर एकदा नजर टाका.
MI vs LSG : वानखेडेवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज गाजले! लखनऊ सुपर जायंट्ससमोर 216 धावांचे लक्ष्य
सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ८३९६ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आहे रोहित शर्माने आतापर्यत आयपीएलमध्ये ६८६८ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे, धवनने ६७६९ धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे. तर पाचव्या स्थानावर सुरेश रैना आहे. सध्या सूर्यकुमार यादव या यादीमध्ये १७ व्या स्थानावर आहे.