फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/Mumbai Indians सोशल मीडिया
MI vs RCB Head to Head Statistics : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२५ चा २० वा सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना आज म्हणजेच सोमवार, ७ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एमआय विरुद्ध आरसीबी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल. आजचा सामना कोण जिंकेल हा चाहत्यांच्या मनातला मोठा प्रश्न आहे. या स्पर्धेच्या दोन्ही संघाच्या कामगिरीवर एकदा नजर टाका.
खरं तर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा फॉर्म या हंगामात फारसा चांगला राहिलेला नाही, मागील चार सामन्यांपैकी मुंबई इंडियन्सच्या संघाने फक्त १ सामन्यात विजय मिळवला आहे उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे या स्पर्धेमध्ये आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. या सीझनमध्ये आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे सोपवण्यात आले आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गेल्या १० वर्षांपासून वानखेडेवर विजय मिळवता आलेला नाही.
The ultimate RO-KO rumble is here! 💥
When two cricketing giants square off, it’s not just a match it’s a battle for supremacy in the #IPLRivalryWeek opener! 🔥😮💨
Who will rise and shine tonight? 👀
Next up on #IPLonJioStar 👉 #MIvRCB | MON, 7th APR, 6.30 PM on Star Sports 1,… pic.twitter.com/mnju5fNsWt
— Star Sports (@StarSportsIndia) April 7, 2025
जर आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड सामन्यांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत ज्यात मुंबईने १९ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. तर आरसीबीने मुंबईविरुद्ध १४ विजय मिळवले आहेत. आजची मेहफिल वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे, त्यामुळे येथील रेकॉर्ड देखील खूप महत्त्वाचा आहे. आरसीबीने शेवटचा २०१५ मध्ये मुंबईला त्यांच्याच बालेकिल्ल्यात हरवले होते. त्यानंतर एमआयने सलग ६ वेळा या मैदानावर त्यांचा पराभव केला आहे. या रेकॉर्ड्सकडे पाहता, आज एमआयचा वरचष्मा असल्याचे दिसते.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त १ सामना जिंकता आला आहे. त्याने वानखेडे मैदानावरच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा विजय मिळवला . याशिवाय, एमआयला चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई आठव्या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खूपच अद्भुत राहिला आहे. आरसीबी ३ पैकी २ सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. जर आज बेंगळुरूने मुंबईला हरवले तर ते पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान देखील मिळवू शकते.