फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद पहिल्या डावाचा अहवाल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात हैदराबादच्या सलामीवीर जोडीने संघाला कमालीची सुरुवात करून दिली होती. परंतु दोन्ही खेळाडूंनी आज संथ सुरुवात केली त्यामुळे आज हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. आजच्या सामन्यांमध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजी करून मुंबई इंडियन्ससमोर 163 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात पहिल्या डावांमध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे यावर एकदा नजर टाका.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजचे सांगायचे झाले तर पहिल्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात केली होती, पण मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना जास्त धावा दिल्या नाही. अभिषेक शर्माने मुंबईसाठी २८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या यामध्ये त्याने ७ चौकार मारले. ट्रॅव्हिस हेड या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही. त्याने २९ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या आणि विल जॅकसने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. नितीश कुमार रेड्डीने संघासाठी आणखी एकदा निराशाजनक कामगिरी केली.
The BOOM Effect 💥#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/ICu4roPtK9
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
हेनरिक क्लासेनने संघासाठी काही शॉट मारले होते. त्याने २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले. तर अभिषेक वर्माने संघासाठी ८ चेंडूंमध्ये १८ नाबाद धावा केल्या आणि पॅट कमिन्स याने ४ चेंडूंमध्ये ८ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर विल जॅक्स याने संघासाठी २ विकेट्स घेतले. यामध्ये त्याने ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशन या दोन हैदराबादच्या महत्वाच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्याने या सामन्यात १ विकेट घेतला. ट्रेंट बोल्टने या सामन्यात १ विकेटची कमाई केली. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघासाठी १ विकेट १८ व्या ओव्हरमध्ये घेतला.
आजच्या सामन्यात रोहित शर्माकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर तिलक वर्माच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. हार्दिकने मागील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे आज संघ कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांची नजर असणार आहे.