फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
MI vs SRH toss Update : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. आज हार्दिक पंड्याचा संघ आणि पॅट कमिन्सची टोळी आमनेसामने असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात वानखेडेवर कोणाचे वर्चव्य असणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सची सुरुवात या स्पर्धेमध्ये फार काही चांगली झाली नाही त्याचबरोबर हैदराबादच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला होता त्यानंतर त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता.
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ मागील सामन्याचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरतील. मागील सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने संघासाठी शतक झळकावले होते तर ट्रॅव्हिस हेड सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माचा सध्या खराब फॉर्म सुरु आहे त्यामुळे आज तो त्याच्या होमग्राउंडवर कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा दमदार फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे आजच्या कामगिरी चाहत्यांची लक्ष असणार आहे. हार्दिक पंड्या मागील सामन्यांमध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही त्यामुळे आज त्याच्या बॅटमधील धावा संघासाठी महत्वाच्या ठरू शकतात.
गुनलिकेतील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघाच्या स्थितीबद्दल सांगायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय मिळाला आहे तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत यामध्ये २ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan elected to field against @SunRisers
Updates ▶️ https://t.co/8baZ67XxKu #TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/uBcAYXn87a
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
रायन रिकेल्टन (विकेटकिपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर – रोहित शर्मा
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा.