Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs SRH :  ‘हिटमॅन’ एक्सप्रेस सुसाट! SRH विरुद्ध Rohit Sharmaचे अर्धशतक अन् रचला इतिहास, वाचा सविस्तर.. 

आयपीएल २०२५ च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात एक विक्रम देखील केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 24, 2025 | 11:16 AM
MI vs SRH :  ‘हिटमॅन’ एक्सप्रेस सुसाट! SRH विरुद्ध Rohit Sharmaचे अर्धशतक अन् रचला इतिहास, वाचा सविस्तर.. 
Follow Us
Close
Follow Us:

MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील  ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १६ व्या षटकात पूर्ण केले. मुंबईने जबरदस्त पुनरागमन करून आयपीएल २०२५ मधील सलग चार सामने जिंकले आहेत. तसेच लागोपाठ सामन्यात अर्धशतक झळकावून रोहित शर्माने आपल्या संघाला विजयी रुळावार आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या सामन्यात रोहितने ७० धावांची खेळी केली.

हैद्राबादने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. यादरम्यान, त्याने ४६ चेंडूंचा सामना करताना १५२ च्या स्ट्राइक रेटने ७० धावा केल्या. रायन रिकल्टन लवकर बाद झाल्यानंतर रोहितने सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन मुंबईचा डाव सांभाळला. यासह, त्याने आयपीएलमध्ये एक विक्रम देखील केला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘किंग’ कोहलीचा जलवा कायम! खुणावतोय IPL मधील ‘विराट’ पराक्रम; मोडणार ‘हा’ विक्रम..

रोहित शर्माच्या १२ हजार धावा पूर्ण

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ७० धावांची खेळी खेळून रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजारांहून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे.  या यादीत रोहित शर्माच्या आधी विराट कोहलीचा नंबर लागतो. विराट कोहलीने ४०७ टी-२० सामन्यांमध्ये १३,२०८ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रोहित शर्माने ४५६ टी-२० सामन्यांमध्ये १२,०५८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या हंगामात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे मुंबईचे विजय देखील सहज शक्य झाले. गुणतालिकेत मुंबईने मोठी झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे.

त्यासोबतच मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ बळी मिळवले. त्याने सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला माघारी पाठवले. त्यानंतर, बोल्टने  अभिनव मनोहर, पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांची शिकार केली. याशिवाय, दीपक चहरला या सामन्यात दोन बळी टिपण्यास यश मिळाले.

हेही वाचा : MI vs SRH : Rohit Sharma चा मुंबई इंडियन्ससाठी ‘बिग शो’, रचला मोठा इतिहास; किरॉन पोलार्डलाही पछाडले..

दीपक चहरने इशान किशनला १ धावांवर तर नितीश कुमार रेड्डीला २ धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय जसप्रीत बुमराहने वेगवान फलंदाजी करणाऱ्या हेनरिक क्लासेनला माघारी पाठवले. तर त्याच वेळी कर्णधार हार्दिक पंड्याने देखील एक गडी बाद केला.

Web Title: Mi vs srh rohit sharmas half century against srh and history created

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs SRH
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral
1

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…
2

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.