रोहित शर्माने आणि किरॉन पोलार्ड(फोटो-सोशल मीडिया)
MI vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. मुंबई इंडियन्सने जबरदस्त पुनरागमन करून आयपीएल २०२५ मधील लागोपाठ चार सामने जिंकले आहेत. तसेच लागोपाठ सामन्यात अर्धशत करून आपल्या संघाला विजयी रुळावार आणण्यात रोहित शर्माने मोठी भूमिका बजावली आहे. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १४३ धावा केल्या. प्रतिउत्तरात मुंबईने १६ व्या षटकात ३ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने ७० धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने एक इतिहास देखील रचला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे.
या कामगिरीसह रोहित शर्माने आपला माजी सहकारी किरॉन पोलार्डला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना किरॉन पोलार्डने २११ सामन्यांमध्ये २५८ षटकार मारून विक्रम रचला होता. परंतु रोहित शर्माने २२९ सामन्यांमध्ये हा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने आता मुंबई इंडियन्ससाठी २६० षटकार ठोकले आहेत. त्याच वेळी, किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्ससोबत असतो.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
तसेच मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो. सूर्याने १०७ सामन्यांमध्ये १२९ षटकार मारले आहेत. तर हार्दिक पंड्याचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. हार्दिक पंड्याचे ११४ सामन्यांमध्ये ११५ षटकार लगावले आहेत. इशान किशनचेही या यादीत नाव आहे. इशानने मुंबईकडून खेळताना १०६ षटकार लागवले आहेत. इशान या हंगामात हैदराबादकडून खेळत आहे.
आयपीएल २०२५ च्या सुरवतीच्या काही सामन्यात रोहित शर्माच्या बॅटने धावा करणेच विसरले होते. आता मात्र तो फॉर्ममध्ये आला आहे. रोहित शर्माने मागील चेन्नईच्या विरुद्ध ७६ धावांची खेळी करून संघाला विजयी केले होते . आता काल झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ४६ चेंडूत ७० धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. मुंबईच्या संघाने सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग फक्त १५.४ षटकात केला आणि लागोपाठ चौथा विजय मिळवला.
MI vs SRH: Rohit Sharma’s ‘big show’ for Mumbai Indians, created big history; even surpassed Kieron Pollard..