फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
मोहम्मद शामीच्या नावावर नवा विक्रम : टी-२० मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत चाहत्यांच्या नजरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर असतील. शामी टी-२० मालिकेत खेळताना दिसला होता, या मालिकेत शामीने बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामधील दुखापतीनंतर मोहम्मद शामी बराच काळ संघाबाहेर होता. त्याच पायाची सर्जरी झाली होती.
त्याने मागील काही महिन्यापासून देशांतर्गत सामने खेळण्यास सुरुवात केली आहे. आता त्याने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले होते. शामीसाठी पुनरागमन सामने काही खास नव्हते, पण गेल्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. आता मोहम्मद शामी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खळबळ माजवण्यास सज्ज आहे. शामी या मालिकेत इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे, शामी पहिल्या एकदिवसीय सामन्यातही हा मोठा पराक्रम करू शकतो.
मोहम्मद शामीने २०२३ च्या विश्वचषकात टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. यानंतर, दुखापतीमुळे शामीला बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आता शामी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. जर शामीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वात जलद २०० बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो.
Three Wickets for Mohammad shami against England in 5th T20i.
Mohammad shami looked good today. Good signs for india in the champions trophy. #INDvsENG #mohammedshami pic.twitter.com/FkERBPaibC— Cricket stan (@Cricobserver21) February 2, 2025
सध्या, शामीने १०१ सामन्यांपैकी १०० डावात १९५ एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे, ज्याने १०२ एकदिवसीय डावांमध्ये २०० बळी घेतले. अशा परिस्थितीत शमी या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाच्या विक्रमाची बरोबरी देखील करू शकतो. आता शमी पहिल्या सामन्यात पाच विकेट घेण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही मोहम्मद शामीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. जसप्रीत बुमराह मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही, त्यामुळे शमीवर बरीच जबाबदारी असेल. शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघातही समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शामीसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही शेवटची मालिका शिल्लक आहे.